Shefali Jariwala : काटा लगा गर्ल म्हणून लहान वयात प्रसिद्ध पावलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. चित्रपटसृष्टी, टिव्ही इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
मुंबई : 28/06/2025
मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचे ( Shefali Jariwala ) निधन झाले आहे. वयाचया 42 व्या वर्षी या अभिनेत्रीचे निधन झाले आहे. मृत्यूचे कारण कार्डियोक अरेस्ट असे सांगण्यात आले आहे. शेफाली मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात रहात होती. अचानक रात्री 11 वाजता तिने छातीत दुखण्याची तक्रार केली. तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रूग्णालयात घेऊन गेला असता डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
शेफाली चे करियर आणि विवाह
शेफाली जरीवाला हिने वयाच्या 19 वर्षी आपल्या करियरला सुरूवात केली होती. तिने सलमान खान आणि अक्षयकुमार सह मुझसे शादी करोगी या चित्रपटातही काम केले होते. तिने हिंदी बिग बॉस मध्येही सहभाग घेतला होता. खुप कमी वयात एका गाण्यामुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले. शेफाली जरीवालाने 2004 मध्ये प्रसिद्ध गायक जोडी मीट ब्रदर्स च्या हरमीत सिंगशी लग्न केले, परंतु ते फार काळ यशस्वी होऊ शकले नाही. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तीने 2014 मध्ये परागशी लग्न केले. शेफालीने फार कमी वयात प्रसिद्धी मिळवली होती,आणि लग्नही कमी वयात केले.
शेफालीला पहिले लग्न अयशस्वी झाल्यावर परत लग्न करायचे नव्हते, मात्र घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात पराग आला आणि या काळात परागचा साधेपणा आवडला आणि त्याची काळजी घेणाऱ्या स्वभावाने तिचे मन जिंकले आणि ते विवाहबद्ध झाले. मात्र आता शेफालीच्या अकाली निधनाने पराग त्यागीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Leave a Reply