Russia Offers India : रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेस्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि देशात त्या विमानांच्या निर्मिती करण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. काय आहे हा प्रस्ताव आणि त्याचा भारताला कसा फायदा होणार आहे, हे आपण जाणून घेऊ.
रशिया : 23/09/2025
भारताची हवाई शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी रशियाने एक महत्त्वाचा प्रस्ताव (Russia Offers India ) दिला आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि स्थानिक ठिकाणी त्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2026 पर्यंत रशिया भारताला पाचही S0400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालींचे वितरण पूर्ण करेल. याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये सध्या अतिरिक्त S-400 प्रणालींसाठी वाटाघाटी सुरू आहेत.
रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निनल कोऑपरेशन (FSMTC) चे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी सांगितले की, भारत आघीच S-400 प्रणाली वापरतो आणि या क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
Su-57 चे वैशिष्ट्य (Russia Offers India Su 57 Stealth Fighters)
रशियाने दिलेल्या प्रस्तावाचे वैशिष्ट्य काय आहे. Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ मल्टी-रोल फायटर जेट आहे, जे भविष्यात हवाई लढाईंसाठी डिझाईन करण्यात आले आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे शत्रूच्या रडारच्या तावडीत सापडत नाही. हे विमान सुपरसॉनिक वेगाने उडू शकते, त्यामध्ये लांब पल्ल्याची मारक क्षमता देखील आहे. हे विमान अत्याधुनिक एव्हियोनिक्सने सुसज्ज आहे आणि मल्टी-डायमेंशनल कॉम्बॅट क्षमता प्रदान देखील आहे.यामुळे भारतीय हवाई दलाला एक नवीन ताकद मिळेल आणि चीनसारख्या देशांच्या वाढत्या हवाई क्षमतेला प्रतिसाद देणे सोपे जाऊ शकते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे नक्कीच अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतासाठी या विमानांचे महत्त्व (Russia Offers India Su 57 Stealth Fighters )
जर भारत Su-57 प्रकल्पात सामील झाला तर आपल्याला केवळ अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान मिळणार नाहीत, तर लोकल प्रॉडक्शनमुळे आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला देखील एक नवीन, मोठी चालना मिळेल. जर हा करार करण्यात आला तर, भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होणार आहे.
Leave a Reply