Rakesh Kishor Vs Bhushan Gavai सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरवर फौजदारी कारवाई होणार.

Rakesh Kishor vs Bhushan Gavai : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल भरन्यायालयात एका वकिलाने ‘बूट फेकून’ हल्ला केला. त्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अशावेळी आता ज्या वकिलाने हल्ला केला, त्याची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

दिल्ली : 07/10/2025

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई  (Rakesh Kishor vs Bhushan Gavai)  यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या वकिलाचे नाव राकेश किशोर असे असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यानंतर त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे आणखी एक विधान समोर येत आहे की, ” जेव्हा धर्म धोक्यात येतो, तेव्हा कुणीही शांत बसलं नाही पाहिजे “. त्याच्या या विधानाने राजकीय वर्तुळातून आणि समाजातील सर्व स्तरातून विविध मते व्यक्त होत आहे.

राकेश किशोर याची प्रतिक्रीया  (Rakesh Kishor vs Bhushan Gavai )

राकेश किशोर याने स्पष्ट केले आहे की, ते कोणालाही प्रवृत्त करत नाही. मात्र प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या हिताचे रक्षण कसे करावे, हे त्यांना माहित असावे असेही त्यांनी नमूद केले. किशोर याच्या मते, जेव्हा मूलभूत धार्मिक धोका निर्माण होते, तेव्हा निष्क्रिय राहणे योग्य नाही, तर सक्रियपणे आपल्या मूल्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याच्या या प्रतिक्रेयेतून विविध अर्थ निघत आहेत.

यासर्व वादात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संयत प्रतिक्रिया देत ‘मला कोणतीही तक्रार दाखल करायची नाही’ असे म्हटले आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!