Maharashtra Rain Update : राज्यात परत एकदा वादळी वाऱ्यांसह, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे.
पुणे : 2025-06-06
सध्या पावसाचा जोर राज्यात कमी झाला होता. काही भागात हलक्या सरींसह पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाल्याने गावातील नद्या-नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागले आहेत. धरणातील जलसाठाही वाढला आहे. आता पुढील दोन तीन दिवसात राज्यात परत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात वादळी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार छत्रपति संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड,लातूर, धाराशिव,चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया,नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधाक पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Table of Contents
नागरिकांना सावधानतेचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वीजा चमकणे, जोरदार वारे (30 ते 40 किमी प्रति तासाच्या गतीने ) आणि हलके ते मध्यम पावासाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ जिल्ह्यातही वीजा चमकणे, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने हलका ते मध्यम गतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत हवामान कसे असेल ?
पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 डिग्री सेल्सीयस आणि किमान तापमान 25 डिग्री सेल्सीयस च्या आसपास असेल.
पुणे शहराची परिस्थिती काय असेल ?
यावर्षी पुणे शहरामध्ये मान्सून जोरात आहे. जून महिन्याचे पावसाची सरासरी केव्हाच पुर्ण झालेली आहे. 31 मे पर्यंत शहरात एकुण 257 मिमी पाऊस झाला आहे. तर 5 जून पर्यंत शहरात 17.2 इतका पाऊस झाला आहे. जूनचे सरासरी पावसाचे प्रमाण 156 मिलीमीटर इतके आहे. मात्र मे महिन्या अखेर हे सरासरीचे प्रमाण पूर्ण झाले आहे. त्यामुळे 9 जून पर्यंत शहराला यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
यावर्षी 17 ते 26 मे पर्यंत शहरात मुसळधार पाऊस झाला. दरवर्षी मे महिन्यात पावसाचे सरासरी प्रमाण फक्त 14 मिमी इतके असते. मात्र 31 मे पर्यंत यावर्षी 267 मिमी पाऊस होऊन गेला आहे. खरं तर जून मध्ये 156 मिमी सरासरी पाऊस होतो. जर 5 जून पर्यंत च्या पावसाचा हिशोब गृहित धरला तर, मागत्या वीस दिवसात शहरात 274.2 मिमी इतका पाऊस झाला आहे. पावसाचा हा मागच्या कित्येक वर्षांमधील रेकॉर्डब्रेक पाऊस आहे.
पावसामुळे शेतीचे नुकसान
काही भागात जास्तीच्या पावसामुळे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी जून अखेर पर्यंत पेरणी करू शकणार आहे. कारण आत्तापर्यंत 350 मिमी पाऊस झाला आहे. यानंतर 7 आणि 8 जून नला वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस होणार आहे. त्यानंतर 13 ते 17 पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे.
Leave a Reply