Saint Tukaram Maharaj Palakhi

Saint Tukaram Maharaj Palakhi, Dehu : आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे. त्यानिमित्ताने सर्व वारकरी त्यांच्या दिंडीसह देहू परिसरात दाखल झाले आहेत. मात्र वारकऱ्यांच्या दिंडींना काही काळ पोलीसांकडून थांबवल्या जात आहेत. याबाबतचे खरे कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

देहू : 2025-06-18

संत तुकाराम महाराज पालखी (Saint Tukaram Maharaj Palakhi,) प्रस्थान सोहळ्यासाठी अवघा वारकरी संप्रदाय देहूत दाखल झाला आहे. महाराष्ट्रातून वारकरी त्यांच्या ठराविक दिंडींसहीत देहू येथे येतात. मात्र यंदा त्यांना पोलीसांकडून रोखण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. पोलिसांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पोलिसांनी वारकऱ्यांना अडवून ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यस्था ठेवायला हवी त्याच पद्धतीने सर्व व्यवस्था केली जात आहेय एकावेळी सगळ्यांना सोडण्यात आले तर, येथे चेंगराचेंगरीचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे थोडे थोडे वारकरी आत सोडण्याचे काम सुरू आहे. वारकऱ्यांची सुरक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे, असे स्पष्टिकरण देवेंद्रे फडणवीस यांनी दिले आहे. 

आपला वारकरी समाज एक दोन तास थांबांवं लागलं तरी त्याची पर्वा करत नाही. माऊलीच्या भेटीकरिता वारकरी अनेक किलोमीटर पायी जातो. त्यामुळे आमचा वारकरी हा शिस्तीत दर्शन घेईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

 

अवघी देहू नगरी विठ्ठलाच्या नामगजरात दुमदुमली 

आषाढी वारीचे वेध वर्षभर वारकरी संप्रदायाला लागलेले असतात. आपल्या घरादाराला काही दिवस मागे टाकून हा संप्रदाय विठ्ठलभक्तीची कास धरतो. आता महाराष्ट्रातील विविध भागांतून महत्त्वाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील. त्यामुळे पुढील काही दिवस आता अवघा महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रममाण झालेला असेल. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!