Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा काढला आहे. शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
इस्लामाबाद : 02/12/2025
सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan Protest News) मोठा राजकीय धुमाकुळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडी अदियाला तुरुंगाबाहेर मोठा मोर्चा काढला आहे. लोकशाही सरकार असताना सरकारने लष्कराच्या हातात सत्ता दिली असून पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे. शिवाय नुकतेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाबत निधनाच्या, प्रकृती खराब झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी (Pakistan Protest News )
सध्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेरही मोर्चा सुरू केला आहे. यामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, बिलावर भुट्टो आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविधोधात नारेबाजी केली जात आहे. तसेच इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा मागितला जात आहे.
सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव रावळपिंडीत 144 कलम लागू केले होते. मात्र या निर्णयाचा काहीही फायदा झालेला नाही. सध्या रावळपिंडीत आणि इतर काही भागात बिकट अस्थिरता निर्माण झाली आहे. पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, इम्रान खान यांना खोट्या आरोपांखाली टाकण्यात आले आहे.
तसेच, न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार आदेशानंतरही त्यांच्या कुटुंबाला आणि जवळच्या व्यक्तींना भेटू दिले जात नाही. प्रशासन न्यायालयाचे नाही, तर लष्कराच्या सुचनांचे पालन करत आहे. गेल्या आठवड्यात आठ वेळा इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे सध्या परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात देखील मोठा गोंधळ सुरू आहे.
प्रशासनाने फेटाळले आरोप (Pakistan Protest News )
सध्या परिस्थिती गुंतागुंतीची होत आहे. मात्र तुरूंग प्रशासनाने पीटीआयचे सर्व आरोप फेटाळले आहे. तुरूंग प्रशासनाने म्हटले आहे की, प्रशासन न्यायालयाच्या सर्व सुचनांचे पालन होत असून इम्रान खान तुरुंगात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या प्रकृती किंवा निधनाबाबतचा दावा खोटा आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पाकिस्तानमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत हिंसक निर्दशने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे असीम मुनीर देखील गोंघळात पडले आहे. त्यांना 29 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान लष्करप्रमुख पद पुन्हा सोपवण्यात येणार होते. मात्र CDF वर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या स्वाक्षरी महत्त्वाची आहे. पण याच वेळी शाहबाज लंडन दौऱ्यावर गेले होते. सध्या ते लंडनमध्ये परतले आहे. परंतु इस्लामाबादला पोहोचलेले नाही. माध्यमांमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ असीम मुनीर यांना शक्तीशाली पद देऊ इच्छित नाही, असे म्हटले जात आहे.
Leave a Reply