Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )
  • Home
  • Heritage
  • Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )
Kailasa Temple

Magnificent Kailasa Temple, Verul – (Building Period – AD 757 to 783 )

भव्यदिव्य कैलास मंदिर ,वेरूळ – (निर्मिती काळ – इ.स. ७५७ ते ७८३ )

जर तुम्हाला मंदिरांची, त्यांच्या शैली जाणून घेण्याची आवड असेल आणि भारतातील सर्वात सुंदर मंदिराला जर तुम्हाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही औरंगाबाद मधील वेरूळला आवश्य भेट द्यायला हवी. येथील कैलास मंदिर म्हणजे एक अद्भूत चमत्कारच आहे. वेरूळ म्हणजे लेण्यांचा एक अनमोल खजिना आहे. त्यातलं एक अनमोल रत्न म्हणजे ‘कैलास मंदिर’ (Kailasa Temple). याचे वर्णन करण्यासाठी खरोखर शब्द अपुरे पडतात. तरीही मी ‘मिसलेनीयस भारत’च्या वाचकांसाठी शब्द आणि छायाचित्रांच्या माध्यमातून कैलास मंदिराची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Kailasa Temple

खरं तर मी एकुण तीन वेळा वेरूळला भेट दिली आहे. परंतु या प्रत्येक भेटीत येथील लेण्या, त्यातील शिल्पं ही अनोखी भासतात. त्यांचे अर्थ नव्याने कळतात. वेरूळमध्ये प्रवेश करताच तुम्हाला जाणीव होते की तुम्ही एका वेगळ्या जगात प्रवेश केला आहे.

बाहेर प्रत्येक पर्यटन स्थळी जशी दुकानांची, विक्रेत्यांची गर्दी असते तशीच येथेही आहे. तुम्ही तिकीट काढून आत प्रवेश केला की एक लोखंडी कडांच्या मधून आपला मार्ग सुरू होतो. थोडं पुढं जाताच समोरच एकदम नजरेस पडतो तो कैलास मंदिराचा दर्शनी भाग. एका मोठा पहाड, त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या मोठ्या शिल्पाकृती दिसतात. येथे जाण्यासाठी एका वर्तुळकृती हिरवळीच्या दोन्ही बाजूने फरशांचा मार्ग तयार करण्यात आला आहे. कैलास मंदिराच्या बाहेर बाजूला कंपाऊंड घालून बसण्यासाठी हिरवळ तयार करण्यात आलेली आहे. त्याच्या मधे कैलास मंदिराचे (Kailasa Temple) प्रवेशद्वार आहे.

Kailasa Temple

कैलास मंदिराचे अद्भूत जग –

या मंदिराच्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत पाऊल टाकले, की तुम्ही आताच्या जगापासून संपूर्णपणे विलग होता. एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा आभास तुम्हाला संपूर्ण मंदिर फिरताना होत रहातो. सुरुवातीला तुम्हाला ठरवताच येत नाही की, मी काय, कोणते आणि किती मूर्ती सौंदर्य बघू. इतका मोठा खजिना येथे तुमच्यापुढे खुला झालेला असतो.वेरूळ येथील कैलास मंदिर (Kailasa Temple) जितके सुंदर आहे तितकीच त्याच्या निर्मीतीची कथा आणि निर्मीतीची पद्धत जाणून घेणे रंजक आहे. आज आपण या मंदिराचा इतिहास, त्याची शैली जाणून घेणार आहोत आणि छायाचित्रांच्या माध्यमातून त्याची सफर करणार आहोत.

मंदिराची आगळी शैली –

कोणत्याही कामामध्ये जर यश हवं असेल तर आधी त्या कामाचा पाया रचावा लागतो, मगच त्या कामाच्या यश शिखरावर पोहोचता येते म्हणजेच त्याच्या कळसाला पोहोचता येते असं आपण पुर्वापार एकत आलो आहोत. या वाक्रप्रचाराच्या अगदी उलट करूनही आज कैलास मंदिर जगाच्या नकाशावर आपलं वेगळं स्थान टिकवून आहे.होय हे अगदी खरं आहे.जगातलं हे असं अद्भूत मंदिर आहे जे आधी कळस आणि मग पाया अशा पद्धतीने निर्माण करण्यात आलेले आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमातून, कलासक्ततेतून हे मंदिर निर्माण झाले आहे. थोडे थोडके नाही तर तब्बल १५० वर्षांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे हे मंदिर होय.

Kailasa Temple
Kailasa Temple

खरं तर असं म्हणतात की हे मंदिर (Kailasa Temple) फक्त अठरा वर्षांच्या कालखंडात निर्माण झाले. मात्र आधुनिक पुरातत्वीय शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार इतके अद्भूत मंदिर इतक्या कमी कालावधीत बांधणे केवळ अशक्य आहे. हजारो कामगार हाताशी घेऊन जरी हे मंदिर निर्माण करण्यास सुरुवात केली तरी त्यासाठी १५० वर्षांचा काळ लागू शकतो. आणि इतिहासातही याच्या निर्मीतीचा कालखंड टप्प्याटप्प्यात असल्याचे दिसून येते.

Kailasa Temple

मंदिर १८ वर्षांत बांधल्याची अख्यायिका –

या मंदिराचे (Kailasa Temple) बांधकाम ज्या राजाच्या काळात करण्यात आले ते महाराज ‘कृष्णराज’ एकदा आजारी पडले. काही केल्या त्यांचा आजार बरा होत नव्हता. तेव्हा राणीने भगवान शंकराला विनवणी केली, की राजाला बरं वाटू दे, तसे झाल्यास मी तुझे भव्य मंदिर बांधून पुर्ण करेल. आणि हे मंदिर बांधून पुर्ण होई पर्यंत मी व्रत करेल. काही दिवसात राजाला आराम मिळाला. नवस बोलल्या प्रमाणे राणीने मंदिर बांधण्याची सुरुवात केली. राजा कृष्णराज यांनाही जेथे शिवाचा वास आहे त्या कैलास पर्वताप्रमाणे हे मंदिर असावे असे वाटत होते. मात्र इतके भव्यदिव्य  मंदिर बांधण्यासाठी बराच मोठा कालावधी लागणार होता.

Kailasa Temple
Kailasa Temple

तोपर्यंत राणीला व्रत करणे अवघड होते. परत राणीने शिवाची अराधना केली, शिवाकडे मदत मागितली. शिवाने राणीला असे अस्त्र दिले की, त्याने दगड कापला तर त्याची वाफ होत असे. अशा काही विशेष अस्त्रांचा वापर करून हे अद्भूत मंदिर कमी कालावधीत तयार झाले. नंतर हे अस्त्र मंदिराच्या पायथ्याशी पुरण्यात आले. म्हणून फक्त अठरा वर्षांत हे मंदिर पुर्ण झाल्याचे सांगण्यात येते. 

मात्र आधुनिक संशोधनानुसार याला १५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागल्याचे बोलले जाते. आख्यायिका किंवा आधुनिक संशोधन यातील काय खरे हे जरी आज निश्चित सांगता येत नसले तरी, हे मात्र नक्की की, राजा कृष्णराज आणि त्यांच्या वंशजांच्या काळात या अद्भूत मंदिराची निर्मिती करण्यात आली. त्यांच्या कलाप्रेमाला दाद द्यायला हवी.

वेरुळ विषयी –

वेरूळ हे ठिकाण लेण्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तीन प्रकारच्या लेण्यांची निर्मीती वेगवेगळ्या कालखंडात करण्यात आल्याचे दिसून येते. याठिकाणी हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीन धर्मांवर आधारीत अशा लेण्या आहेत. त्यातील सर्वांत मोठे आहे ते ‘कैलाश मंदिर’. या मंदिराचे मुळ नाव ‘कैलासनाथ’ होते. कैलास मंदिराची (Kailasa Temple) निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण (प्रथम) याच्या काळात झालेली आहे. या लेण्यांपैकी १० क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे. 

इसवी सनाच्या ७५३ ते ७५७ या काळातील हा लेख आहे. कैलास लेणे निर्माण करणारा राजा कृष्ण (पहिला) हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या ७५७ ते ७८३ या काळातील असावी असे यावरून समजते.म्हणजे हजारो वर्षे झाली तरी हे मंदिर आजही त्याचे सौंदर्य टिकवून उभे आहे.

या मंदिराची निर्मीती हा एक चमत्कार समजतात. सम्राट कृष्णराज यांच्या नंतरही पुढील राजांच्या काळात या मंदिराचा विस्तार सुरु राहिल्याचे जाणकार सांगतात. मंदिराच्या भोवतालच्या ओवऱ्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर अशा अनेक भागांची निर्मीती पुढील काही काळात होत राहिली. हे मंदिर (Kailasa Temple) म्हणजे शैलमंदिर शिल्पप्रकारचे मंदिर आहे.

कसे बांधण्यात आले मंदिर –

आधी कळस आणि मग पाया अशा कार्यशैलीने हे मंदिर (Kailasa Temple) निर्माण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एक मोठा दगडी पर्वत त्यासाठी निवडण्यात आला. एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास २० टन दगड फोडून वेगळा करण्यात आला.  त्याच्या पायाला मंदिराच्या गोपुरासाठी आणि मुख्य मंदिराच्या मुख्या भागासाठी काही जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर तीस मीटर रूंद आणि तितकेच खोल असे चर खणून घेण्यात आले. मध्यभागी उरलेल्या ६० मी. लांब आणि ३० मी. रुंद दगडातून हे कैलास मंदिर उभे करण्यात आले. एकुण २७६ फुट उंच आणि १५४ फुट रुंद इतकया भव्य आकारात हे मंदिर बांधण्यात आले आहे.

Kailasa Temple
Kailasa Temple

पुढच्या भागातून प्रवेशद्वार व गोपूर खोदण्यात आले. खरं तर या मंदिराचा आराखडा हा अगदी साधा आहे. चौकोनी गाभारा, त्याच्या भोवताली पाच छोटी देवळं, समोर चौरस मंडप, त्यासमोर नंदिंमंडप,मंडप, त्यांना जोडणारा दगडी पूल आहे. मंदिराच्या मुख्य पायालाच प्रचंड आकारातील हत्ती, सिंह, व्याघ्र यांच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. या प्राण्यांच्या डोक्यावर संपूर्ण मंदिराचा भार पेलण्यात आलेला आहे, अशी मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिराच्या (Kailasa Temple) भोवती तुम्ही जेव्हा चक्कर मारता तेव्हा तुम्हाला या सर्व मूर्ती पाहून आश्चर्य वाटत रहाते. या संपूर्ण मंदिरात उभारण्यात आलेले स्तंभ, कोनाडे, छत, शिखर हे सर्व द्राविड शैलीत आहेत. प्रत्येक शिल्प, नक्षीकाम हे अत्युच्य दर्जाचे आहे. या मंदिराच्या मुख्य चौकात भव्य गजमूर्ती आहेत. याच भागात ध्वजस्तंभ आहेत.

Kailasa Temple
Kailasa Temple

कैलासमंदिरातील (Kailasa Temple) कथाशिल्प –

येथील शिल्पांविषयी वर्णन करण्यासाठी आपली शब्दसंपदा तोकडी पडते. आपण जेव्हा या मंदिरात प्रवेश करतो तेव्हापासूनच आपली नजर भिरभरायला लागते. हे पाहू की ते, या भिंतीपाशी जास्त वेळ घालू की, इकडे जास्त वेळ थांबू अशी आपली अवस्था होते. येथे रामायण आणि महाभारत या आपल्या संस्कृतीतील दोन महाकाव्यातील अनेक प्रसंगाचे चित्रण आहे. काही शिल्पं आकारने बरीच भव्य आहेत. तर काही अगदीच लहान. त्यांना बरेच बारकाईने पाहिल्यावर त्यांच्यातील कथाबीज आपल्याला समजू शकते. या मंदिरात (Kailasa Temple) आपल्याला रावण व जटायू यांचा संग्राम, त्रिपुरवध असे प्रसंग कोरण्यात आलेले आहे.

Kailasa Temple
Kailasa Temple

येथिल कैलासउद्धारणाचा देखावा विशेष आहे. शिवपार्वतीचे अधिष्ठान जेथे आहे असा कैलास पर्वत गदागदा आपल्या भक्कम बाहूने हलवण्याचा प्रयत्न करणारा रावण, भयभीत झालेली पार्वती, शांत असणारे भगवान शंकर अशी अनेक शिल्पं येथे आहेत. या शिल्पांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी तंतोतंत दगडातून कोरून दाखवण्यात कलाकार यशस्वी झालेले आहेत. या संपूर्ण मंदिराला आतून बाहेरून रंगकाम करण्यात आले होते. काळाच्या ओघात कदाचित ते धूसर होत गेले. काही शिल्पांचे अर्थ समजण्यासाठी या लेण्यांचा एखादा अभ्यासक सोबत असणे हे तर खरं तर येथील भेटीचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी मदत होऊ शकते.

लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर (Kailasa Temple) आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगांच्या समोर मोठा सभामंडप आहे. या मुख्य सभामंडपाच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प  कोरण्यात आलं आहे. येथेच बाजूने अनेक भव्य, सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत. त्या प्रत्येक स्तंभावर विशेष कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत.या मंदिराचं विशेष हे की येथील शिल्पातील प्राणी हे पुर्णाकृती आहेत. या मंदिराची रचना एखाद्या रथाप्रमाणे असून, हा रथ हत्ती, सिंह यांच्या डोक्यावर तारलेला आहे. मंदिराच्या गोल फिरून आपण ही सर्व शिल्पे पहात राहतो. हे मंदिर म्हणजे गोपुरं दिसतात. तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात.

२० हजार टन दगडांचं पुढं काय करण्यात आलं –

या मंदिराच्या निर्मीतीकाळात सुमारे २० हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आल्याचा अंदाज अभ्यासक वर्तवतात. मात्र नंतर इतक्या मोठ्या प्रमाणातील दगड मंदिराच्या आसपास कुठेच सापडले नाहीत. त्याचं पुढे काय करण्यात आलं याचे अनेक तर्कवितर्क सांगण्यात येतात. कैलास मंदिराच्या आसपास अनेक लहान मोठे मंदिरं आहेत, तसेच वेरूळ ज्या भागात आहे त्या मराठवाड्यात अनेक मंदिर आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकुट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरातील काही मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिराच्या बांधकामावेळी बाहेर पडलेल्या दगडातून केले असल्याचीही एक शक्यता वर्तवली जाते.

जेव्हा कैलास मंदिराची (Kailasa Temple) निर्मीती करण्यात आली तेव्हा हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या रंगात रंगवलेले होते. कारण भगवान शंकराचा वास जेथे असतो तो कैलास पर्वत बर्फाच्छादित असतो. तसेच हे मंदिर दिसावे हा त्यामागचा हेतू. असेही सांगतात की, राजा कृष्णराज यांना जी प्रजा कैलास पर्वतावर जाऊ शकत नाही त्यांना आपल्याच राज्यात शिवाचे दर्शन व्हावे या हेतूने त्यांनी कैलासमंदिराला कैलास पर्वताचे रुप दिले. काळाच्या ओघात हा पांढरा रंग उतरल्याचे दिसून येते. मात्र मंदिराच्या काही भागाला आजही या रंगाचे अवशेष असल्याचे दिसून येते.

सांडपाणी वाहून नेण्याची अद्भूत सोय –

हजारो वर्षांपासून आपले अढळ स्थान   टिकवून ठेवणाऱ्या या मंदिरातील सांडपाणी वाहून नेण्याची सोय अद्भूत म्हणता येईल. कारण पावसाळ्यात येथे कुठेही पाणी साठून रहात नाही. कोणत्याही भींतीवर, फरशीवर तुम्हाला शेवाळे साचलेले दिसत नाही. पाणी वाहून नेण्याची सोय अशा पद्धतीने केलेली आहे की, ठरावीक ठिकाणी उंच, सखलपणा, पन्हाळे की वरवर ते दिसत नसले तरी पाणी कोठेही साठून रहात नाही, त्यामुळे मंदिर ज्या दगडात बांधण्यात आले आहे त्याचे आयुष्यमान वाढून ते टिकण्यास मदत झालेली आहे.

या ठिकाणाला भेट द्यायला कसे पोहोचता येईल –

औरंगाबाद शहरापासून वेरूळ हे गाव सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही जर औरंगाबाद शहरात मुक्कीमी असाल तर सकाळी लवकर तेथे पोहोचू शकता. स्वतःचे वाहन, बस, रिक्षा अशा अनेक पर्यायांचा वापर करणे सोयीस्कर आहे.

वेरूळच्या लेण्या आणि कैलास मंदिर (Kailasa Temple) पहाताना आपल्याकडे भरपूर वेळ असायला हवा. तरच हे लेणी सौंदर्य आपल्याला अगदी निवांत बघता येईल.

खरोखर आजच्या काळात इतके अप्रतिम, पौराणिक मंदिर आपल्याला पहाता येतयं हे खरं तर भाग्यच. संपूर्ण जगाने ज्या लेण्यांना वैश्विक वारसा असल्याची मान्यता दिली आहे, ते आपण भारतीयांनी जपणं, त्यांचा आनंद घेत त्याची महती इतरांपर्यंत पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे. कारण हा वारसा पुढील अनेक पिढ्यांनाही तितकाच समृद्ध करणारा आहे.

ज्योती भालेराव !

Leave a Reply

Releated Posts

Saint Mahadamba – The first Saint poet in Marathi ( Born 1238 AD -Died 1308 AD)

संत महदंबा – मराठीतील पहिल्या संत कवीयत्री ( जन्म इ.स.१२३८- मृत्यू इ.स.१३०८ ) भारत हा देश आपल्या सांस्कृतिक…

ByByTanishqa DongareMar 11, 2025

Agra Red Fort Witness to the Political Journey of Hindustan (Reconstruction -1573 AD)

आग्रा लाल किल्ला (Agra Red Fort ) हिंदूस्तानच्या राजकीय प्रवासाचा साक्षीदार ( पुर्नबांधणी -इ.स. १५७३) आग्रा शहर (…

ByByJyoti BhaleraoNov 24, 2024

अष्टविनायक गणपती यात्रा – महाराष्ट्र (२०२४)

संपूर्ण भारतातच नाही तर देशविदेशातही आपल्या लाडक्या गणेशाच्या मूर्ती सापडल्याचे उल्लेख आढळतात. इतका हा बाप्पा ग्लोबल आहे. हिंदू…

ByByJyoti BhaleraoSep 15, 2024

Check Point Charlie – A mark of the division of Germany! (Made in 1961)

चेक पॉईंन्ट चार्ली (Check Point Charlie) – जर्मनीच्या विभाजनाचे निशाण ! दुसरे महायुद्ध, विध्वंस आणि जर्मनी यांचा फार…

ByByJyoti BhaleraoMay 5, 2024

ताज महाल – एक अविस्मरणीय अनुभव , Taj Mahal – an unforgettable experience. Built in 1631

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असणारा असा ‘ताज महाल’. या वास्तूविषयी इतक्या अख्यायिका, वाद,कथा आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत की,…

ByByJyoti BhaleraoApr 29, 2024

संत निर्मळाबाई, सहजसुंदर अभिव्यक्तीचा स्रोत (इ.स.14 वे शतक )

संत निर्मळाबाई. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच संत परंपरेचा, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून निर्माण…

ByByTanishqa DongareMar 8, 2024

बौद्ध लेणी, वेरूळ – मनःशांतीचे प्रतिक (Buddhist cave,verul 6th to 10th century AD) ( इ.स.६ ते १० वे शतक )

भारतातील मंदिरं, प्रार्थनास्थळं आणि लेणीवैभव हे जगासाठी कायमच आकर्षणाचा विषय आहे. विविध धर्मांची मंदिरं आणि प्रार्थनास्थळं, त्यांच्या कलाकुसर,…

ByByJyoti BhaleraoDec 4, 2023

Jain Caves, Verul, a unique sculpture (Cave No. 30 to 34)

जैन लेणी (Jain Caves) , वेरूळ , एक अजरामर शिल्पाकृती ( लेणी क्रमांक ३० ते ३४) भारतात सुमारे…

ByByJyoti BhaleraoOct 27, 2023

Shravan Mass, श्रावण महिना, महत्त्व आणि सण समारंभ – (२०२३)

आपल्या भारत देशाला सण, समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले…

ByByJyoti BhaleraoAug 7, 2023
22 Comments Text
  • acheteriptvabonnement says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Nice blog here Also your site loads up very fast What host are you using Can I get your affiliate link to your host I wish my site loaded up as quickly as yours lol
  • bei binance anmelden says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
  • binance prihlásení says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
  • referencia de Binance says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
  • Binance says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
  • bizzlyn says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks
  • businesstrick says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    My brother suggested I might like this website He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks
  • Tech to Force says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Tech to Force I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.
  • globesimregistration says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I do trust all the ideas youve presented in your post They are really convincing and will definitely work Nonetheless the posts are too short for newbies May just you please lengthen them a bit from next time Thank you for the post
  • techyin says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Hi my family member I want to say that this post is awesome nice written and come with approximately all significant infos I would like to peer extra posts like this
  • binance says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/es/register?ref=T7KCZASX
  • Sky Scarlet says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Sky Scarlet I do not even understand how I ended up here, but I assumed this publish used to be great
  • Technoob says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Technoob I like the efforts you have put in this, regards for all the great content.
  • GlobalBllog says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    GlobalBllog Hi there to all, for the reason that I am genuinely keen of reading this website’s post to be updated on a regular basis. It carries pleasant stuff.
  • binance Anmeldung says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
  • Enregistrement says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
  • truck scales in Al-Anbar says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    With a focus on precision and reliability, BWER offers state-of-the-art weighbridge systems to Iraq’s industries, meeting international standards and supporting operational efficiency.
  • معدات قياس الوزن العراق says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    At BWER Company, we prioritize quality and precision, delivering high-performance weighbridge systems to meet the diverse needs of Iraq’s industries.
  • Створити особистий акаунт says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
  • binance referral bonus says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
  • Leave a Reply