Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 1

छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान शिवनेरी किल्ला –

पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान पुणे जिल्ह्यात असून, त्यांचे बालपण याच शहरात गेले. पुढे जाऊन छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांचे वास्तव्यही पुण्यातच होते, त्यामुळे या शहरात अनेक इतिहासकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक मोठे नेते, समाजसुधारक, साहित्यिक पुण्यात वास्तव्यास होते. त्यांच्याही आठवणीस्वरूपातील अनेक वास्तू, संग्रहालया शहरात आहेत. त्यात अनेक इतर आधुनिक पर्यटन स्थळं, संग्रहालयांची भर पडलेली आहे. अशा वारसास्थळांबाबत संपन्न असणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा वारसा मला वाटतो तो म्हणजे ‘शिवनेरी किल्ला’.

Shivaji Maharaj

         ‘शिवनेरी किल्ला’ म्हटल की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, ती म्हणजे आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांचा (Shivaji Maharaj) जिथे जन्म झाला ती पावनभूमी. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आणि रयतेचा जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान अशी ओळख मिरवणारा ‘शिवनेरी किल्ला’ प्रत्येक मराठी माणसासाठी एक हळवा कोपरा आहे. आजही या किल्ल्यावरील या वास्तूला भेट दिली की मन शौर्य,तेज आणि पराक्रमाच्या भावनेने भरून येते.

         हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. अगदी गावात प्रवेश केल्या केल्याच लांबून किल्ल्याचे दर्शन होते. पुणे शहरापासून सुमारे १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच याठिकाणाला भेट देत असाल तर किल्ल्याविषयी तुमची उत्सुकता जास्त ताणली जाते. कारण आपल्या लाडक्या राजांचे जन्मस्थळ प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन उताविळ झालेले असते. परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला बरीच पायपीट करावी लागणार आहे यासाठी मनाची तयारी केलेली बरी. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.

         भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. हा किल्ला चारही बाजूंनी कठिण चढाव चढत आपल्याला सर करावा लागतो. मार्गामधे लांब लांब सपाट दगडी पायर्या चढण चढण्यासाठी बांधलेल्या आहेत. सुरूवातीलाच भव्य दरवाजे, तटबंदी पार करत आपला प्रवेश किल्ल्याच्या आत होतो. किल्ल्यावर अनेक जुन्या बांधकामाच्या पाऊलखुणा पदोपदी दिसतात. ज्यांना इतिहासात रमायला आवडते त्यांच्यासाठी ही सैर रमणीय ठरते. आजही  चांगल्या स्थितीत असणारी घोड्यांसाठी बांधलेली पागा बघायला मिळते. बराच वेळ चालल्यामुळे याठिकाणचा गारवा पर्यटकांना येथे विसावा घ्यायला लावतो.संपुर्ण किल्ल्यावर बरेच भव्य दरवाजे आहेत. महादरवाजा, गणेश दरवाजा, हत्ती दरवाजा, मेणा दरवाजा, कुलुप दरवाजा ही त्यातील काही महत्त्वाची नावे.  

पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान पुणे जिल्ह्यात असून, त्यांचे बालपण याच शहरात गेले. पुढे जाऊन छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांचे वास्तव्यही पुण्यातच होते, त्यामुळे या शहरात अनेक इतिहासकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक मोठे नेते, समाजसुधारक, साहित्यिक पुण्यात वास्तव्यास होते. त्यांच्याही आठवणीस्वरूपातील अनेक वास्तू, संग्रहालया शहरात आहेत. त्यात अनेक इतर आधुनिक पर्यटन स्थळं, संग्रहालयांची भर पडलेली आहे. अशा वारसास्थळांबाबत संपन्न असणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा वारसा मला वाटतो तो म्हणजे ‘शिवनेरी किल्ला’.

         ‘शिवनेरी किल्ला’ म्हटल की एकच गोष्ट डोळ्यासमोर येते, ती म्हणजे आपल्या लाडक्या छत्रपती शिवरायांचा (Shivaji Maharaj) जिथे जन्म झाला ती पावनभूमी. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आणि रयतेचा जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान अशी ओळख मिरवणारा ‘शिवनेरी किल्ला’ प्रत्येक मराठी माणसासाठी एक हळवा कोपरा आहे. आजही या किल्ल्यावरील या वास्तूला भेट दिली की मन शौर्य,तेज आणि पराक्रमाच्या भावनेने भरून येते.

         हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. अगदी गावात प्रवेश केल्या केल्याच लांबून किल्ल्याचे दर्शन होते. पुणे शहरापासून सुमारे १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच याठिकाणाला भेट देत असाल तर किल्ल्याविषयी तुमची उत्सुकता जास्त ताणली जाते. कारण आपल्या लाडक्या राजांचे जन्मस्थळ प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन उताविळ झालेले असते. परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला बरीच पायपीट करावी लागणार आहे यासाठी मनाची तयारी केलेली बरी. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.

         भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. हा किल्ला चारही बाजूंनी कठिण चढाव चढत आपल्याला सर करावा लागतो. मार्गामधे लांब लांब सपाट दगडी पायर्या चढण चढण्यासाठी बांधलेल्या आहेत. सुरूवातीलाच भव्य दरवाजे, तटबंदी पार करत आपला प्रवेश किल्ल्याच्या आत होतो. किल्ल्यावर अनेक जुन्या बांधकामाच्या पाऊलखुणा पदोपदी दिसतात. ज्यांना इतिहासात रमायला आवडते त्यांच्यासाठी ही सैर रमणीय ठरते. आजही  चांगल्या स्थितीत असणारी घोड्यांसाठी बांधलेली पागा बघायला मिळते. बराच वेळ चालल्यामुळे याठिकाणचा गारवा पर्यटकांना येथे विसावा घ्यायला लावतो.संपुर्ण किल्ल्यावर बरेच भव्य दरवाजे आहेत. महादरवाजा, गणेश दरवाजा, हत्ती दरवाजा, मेणा दरवाजा, कुलुप दरवाजा ही त्यातील काही महत्त्वाची नावे.  

         पुढे बरेच अंतर चालल्यानंतर अखेर ज्याठिकाणी शिवरायांचा (Shivaji Maharaj) जन्म झाला ते ठिकाण नजरेस पडते. दगडी बांधकाम असणारी ही गढीसारखी दिसणारी  भक्कम वास्तू प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे करते. इथे प्रवेश करताच समोरच एक लाकडी कुलुपबंद दरवाजा नजरेस पडतो. त्याच्या बाजुच्या  खिडकीतून एक पाळणा दिसतो. याच ठिकाणी शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. या खिडकीच्या दोन्ही बाजुने अरूंद जिने असून, वर गेल्यावर मेघडंबरीसारख्या खिडक्या आणि ऐसपैस जागा आहे. याठिकाणी पर्यटकांना वेळ घालवता येतो. येथुन शिवनेरीचा रम्य परिसर दृष्टीस पडतो. संपुर्ण परिसरात जागोजागी जुन्या वास्तुंचे अवशेष दिसतात. मागच्या बाजुला पाण्याचे मोठे तळे आहे. फिरण्यासाठी हा परिसर बराच मोठा आहे. किल्ल्यावरच ‘शिवाई’ देवीचे जुने मंदिर आहे. याच देवीला जिजाऊंनी आपल्याला पराक्रमी पुत्र झाला तर तुझे नाव त्याला ठेवेल असा नवस बोलला, त्याप्रमाणे पुत्रप्राप्तीनंतर याच शिवाई देवी वरून राजांचे ‘शिवाजी’ हे नाव ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. एक संपुर्ण दिवस इतिहासाच्या सान्निध्यात घालवण्याचा निखळ आनंद हा किल्ला आपल्याला नक्कीच देतो.

Authorज्योती भालेराव

Leave a Reply