Leh Gen Z Protest : लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि आदिवासींचा देखील दर्जा मिळावा यासाठी लेहमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं.
लेह : 25/09/2025
लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच आदिवासींचा दर्जा मिळावा यासाठी लेहमध्ये मोठे आंदोलन (Leh Gen Z Protest) सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. पोलीस आणि विद्यार्थी समोरासमोर आले.यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेहमधील भाजपच्या कार्यालयात तसेच सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली, या घटनेत मोठे नुकसान झालं आहे. आंदोलनानं उग्र रूप घेतल्यानंतर, गृहमंत्रालयाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. गृहमंत्रालयानं लडाखच्या नेत्यांसोबत चर्चेला सुरूवात केली आहे. पुढची बैठक आता येत्या 6 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये होणार आहे.
हवामान बदलासाठी प्रदीर्घ काळ लढा देणारे सोनम वांगचुक हे गेल्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत इतर काही जणांनी देखील उपोषण सुरू केलं होतं, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लडाखचा समावेश हा सहावा अनुसूचित करावा तसेच राज्याचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसांपासून लेहमध्ये आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान दोन महिला आंदोलकांची तब्येत अचानक बिघडली असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
आंदोलकांची तब्येत बिघडली (Leh Gen Z Protest)
या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन महिलांची तब्येत अचानक बिघडल्यांने अधिक आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, त्यानंतर आंदोलकांची भाजप कार्यालय तसेच सीआरपीएफच्या एका गाडीला आग लावल्याची घटना घडली आहे. लेह येथील हिल काऊंन्सिल इमारतीवर देखील जोरदार दगडफेक करण्यात आली, दरम्यान परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलकांची मागणी (Leh Gen Z Protest)
या लढ्याचं नेतृत्व लडाखमधील जनता करत आहे, गृहमंत्रालयाकडून आम्हाला सहा ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे, मात्र आंदोलकांची अशी मागणी आहे की त्यापूर्वीत या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा, असं आयोजकांनी म्हटलं आहे. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून आता लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. गृहमंत्रालयाची तेथील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.
Leave a Reply