BJP MP Medha Kulkarni : भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशा मागणी केली आहे.
पुणे : 2025-06-23
पुण्यातील भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ) यांनी एक मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतर करून त्याला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. सध्या मेधा कुलकर्णी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्या एका कार्यक्रमात उद्धाटनासाठी गेल्या असताना, तेथेही वेळेआधी पवारांनी उद्धाटन करून घेतल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी केली आहे.
मेधा कुलकर्णींची मागणी
पुणे रेल्वे स्थानकाची डागडुजी करणे फार महत्त्वाचे आहे. पुणे स्थानकाच्या आवारात या शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. या स्थानकाची डागडुजी करत असताना हा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे. सगळ्या देशातील वेगवेगळी रेल्वे स्थानकं, विमानतळं या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा. हीच मागणी मी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्यायला हवं, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अटक के कटक इथपर्यंत साम्राज्या नेलं. यांचं प्रतिक हे शनिवारवाडा आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांते नाव द्यावे, अशी मागणी मी केली आहे, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
Leave a Reply