Israel-Iran War : मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक भारतीय हे दुबईमध्ये अडकले आहेत. त्यांना परत भारतामध्ये आणणारे विमान मुंबईमध्ये दाखल झाले.
मुंबई : 03-03-2026
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहेय इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला आहे. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहेय जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्रे हल्ले केले जात आहेत. जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्रे हल्ले केले जात आहेतय यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनई यांची हत्या झाल्यामुळे इराण आक्रमक झाला आहे. या युद्धाच्या परिस्थीमध्ये हजारो भारतीय हे मध्यपूर्व आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये दुबईतील पहिले विमान हे भारतीयांना घेऊन सुरक्षित मुंबईमध्ये दाखल झाले आहे.
हवाई उड्डाणांवर परिणाम (Israel-Iran War)
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत होते. अखेर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे.
भारतीय नागरिक परतले (Israel-Iran War)
युद्धजन्य अशा परिस्थितीत काल रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाईट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यावर आलेले आपबीती सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दुबईहून आलेले विमान पोहोचले आहे. यावेळी एका प्रवाशाने त्याचा दुबईचा थरारक अनुभव सांगितला. तो म्हणाला की, ” आम्ही मुंबूईहून हैद्राबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानत बसलोही होतो. जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरूवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे 7-8 तास निघून गेले. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही,” अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे.
दुबईतील सध्याच्या परिस्थितीबाबत सांगितले की, आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र दोन दिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होती. आता तेथील लोक थोडे निश्चित झाले आहेत.