Iran-Israel War : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता उघड युद्धात रुपांतरित होताना दिसत आहे. इराण-इस्रायल युद्धात सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूने परिस्थीती आणखी बिघडली आहे.
Iran : 01-03-2026
मध्यपूर्वेतील संघर्षाने आता रणांगण सोडून थेट धार्मिक युद्धाचे रुप धारण केले आहे. इराणचे (Iran-Israel War) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणच्या पवित्र कोम शहरातील जमकरन मशिदीच्या निळ्या घुमटावर ‘लाल झेंडा’ फडकवण्यात आला आहे. शिया परंपरेत आणि इराणी संस्कृतीत या लाल झेंड्याच्या फडकणे म्हणजे “अन्यायाचा आणि सांडलेल्या रक्ताचा सूड अद्याप बाकी आहे.” या एका कृतीने इराणने अमेरिका आणि इस्रायलला स्पष्ट संदेश दिला आहे की, आता युद्ध थांबणार नाही, तर ते अधिक भीषण होईल.
Table of Contents
लाल झेंडा : युद्धाची अधिकृत घोषणा (Iran-Israel War)
इराणी सरकारी माध्यमांनी या घटनेचे वर्णन अत्यंत गंभीर स्वरूपात केेले आहे. “रक्तासाठी रक्त हे ब्रीदवाक्य आता इराणच्या लष्करी कारवाईचा आधार बनले आहे. जेव्हा एखाद्या महान नेत्याचे किंवा योद्ध्याचे रक्त सांडले जाते, तेव्हा त्याचा बदला घेईपर्यंत हा लाल झेंडा फडकवत ठेवला जातो. यापूर्वी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर असा झेंडा फडकवण्यात आला होता. आता खामेनींच्या मृत्यूनंतर हा झेंडा पुन्हा दिसल्याने शिया जगामध्ये युद्धाचा ज्वर चढला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात ‘जिहाद’ पुकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकन तळांवर क्षेपणास्रांचा पाऊस (Iran-Israel War)
झेंडा फडकवल्यानंतर काही तासांतच इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर आणि इस्रायलच्या प्रमुख शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्रे आणि आत्मघाती ड्रोनचा मारा केला. कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकन तळांजवळ प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणचे संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी घोषणा केली आहे की, ” तेहरान कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे आणि अमेरिका-इस्रायलला त्यांनी केलेल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल.” अली लारीजानी यांनीही इशारा दिला आहे की, “आम्ही असे प्रत्युत्तर देऊ जे पाश्चात्य जग कधीही विसरणार नाही”.
🇮🇷🚩 Red flag raised over Jamkaran Mosque in Iran, signaling revenge for the blood of the Supreme Leader and Commander‑in‑Chief according to state media. pic.twitter.com/DmQU4R8wOA
— WAR (@warsurv) March 1, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची विनाशकारी धमकी (Iran-Israel War)
इराणच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले आक्रमक धोरण कायम ठेवले आहे. ट्रम्प यांनी इराणला उद्देशून म्हटले की, ” इराणने पुन्हा हल्ला कऱण्याची चूक करून नये. जर त्यांनी अमेरिकन सैन्याला किंवा मालमत्तेला इजा पोहोचवली, तर आम्ही अशा ताकदीने प्रत्युत्तर देऊ की जे संपूर्ण जगाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.”ट्रम्प यांच्या या विधानाने आखाती देशांमध्ये अधिकच भीती पसरली असून, अमेरिका इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना किंवा अण्वस्र केंद्रांना लक्ष्य कऱण्याची शक्यता वाढली आहे.
पाकिस्तान आणि इराकमध्ये संतापाचा उद्रेक (Iran-Israel War)
खामेनींच्या हत्येचे पडसाद केवळ इराणपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पाकिस्तानातील कराचीमध्ये संतत्प जमावाने अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करत तो पेटवून दिला, ज्यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. इराकमध्येही तीन दिवसांचा अधिकृत शोक जाहीर कऱण्यात आला असून, तिथेही अमेरिका विरोधी निदर्शने तीव्र झाली आहे. भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना या प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.