Shubhanshu Shukala : भारताने आज पुन्हा एकदा अंतराळात आपल्या अंतराळवीराला झेपावताना पाहिले आहे. भारतासाठी ही फार मोठी झेप आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज ही कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. हा क्षण पहाताना त्यांचे पालकही भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
फ्लोरीडा : 25/06/2025
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukala )आज 25 जून ला ॲक्सियन मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकास जात आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतप शुभांशू यांनी उद्धार काढले, व्हॉट ए राईड. प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर शुभांशू यांचे पालक आशा शुक्ला आणि शंभू दयाळ शुक्ला भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12:00 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लॉंच करण्यात आले. सर्व अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे 28.5 तासांनंतर 26 जून रोजी दुपारी 4:30 वाजता आयएसएसशी जोडले जाईल.
तब्बल 41 वर्षांनंतर घडणार अंतराळाचा प्रवास
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतऱाळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.
काय आहे या मोहिमेचे उद्दिष्ट
ॲक्स -4 मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे आहे. ही मोहिम खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील आहे आणि ॲक्सियम स्पेस नियोजनाचा एक भाग आहे.जे भविष्यात एक व्यावसायिक अंतराळ स्थानक (ॲक्सियन स्टेशन ) बांधण्याची योजना आखत आहे.
ॲक्सियम -4 ही मोहीम या आधी 6 वेळा पुढे ढकलण्यात आली
1 29 मे ला , ड्रॅगन अंतराळयानाची तयारी नसल्याने प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.
2 8 जून ला ते होणार होते. फाल्कन-9 रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार नव्हते.
3 नवीन तारीख 10 जून देण्यात आली. पुन्हा एकदा खराब हवामानमुळे ते पुढे ढकलले.
4 11 जून रोजी चौथ्यांदा मोहिम आखली, यावेळी ऑक्सिजन गळती झाली.
5 नवीन तारीख 19 जून देण्यात आली. हवामानाची अनिश्चितता आणि क्रु मेंबर्सच्या आरोग्याच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली.
6 सहावी मोहिम 22 जूनला होणार होती, आयएसएसच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्युलचे मुल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक होता. त्यामुळे मोहिम पुढे ढकलण्यात आली.
Leave a Reply