Narendra modi-Mark karni

India-Canada G-7 : भारत आणि कॅनडा ने आपल्यातील राजनैतिक संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांनी  उच्चायुक्तांच्या नेमणुकीच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क कार्नी यांनी झालेल्या बैठकीत सकारात्मकता दर्शवत व्यापर, संपर्क आणि सहयोग वाढवण्यावर चर्चा केली. 

कनानास्किस : 2025-06-18

भारत आणि कॅनडा मधील संबंध गेल्या काही काळापासून सुरळीत नाहीत. मात्र आता दोन्ही दोशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याचे सकारात्मक चिन्हे दिसून येत आहे. भारत आणि कॅनडा दोन्ही देशांनी लवकरत दोन्ही देशांच्या राजधानीमध्ये उच्चायुक्त नेमणूकीच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे, अशी माहिती विदेश सचिव विक्रम मिसली यांनी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे मार्क कार्नी यांची, कनानास्किस मध्ये 7-शिखर संमेलन दौऱ्यात सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा घडली. मिसरी यांनी बैठकीशी संबंधीत एक निवेदन जाहीर केले आहे की, या चर्चेत नैतिक मुल्य, लोकशाही आणि कायद्याचे राज्य, दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संपर्क आणि इतर देशातील अनेक समान मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. 

उच्चायुक्तांची लवकरच नेमणुक 

विक्रम मिसरी यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील पंतप्रधानांनी या दोन्ही देशांमधील महत्त्वपूर्ण संबंधांना परत एकदा निश्चित रूप देण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहेत. लवकरच दोन्ही देशांमधील राजधानींमध्ये उच्चायुक्तांची नेमणुक करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील नागरिकांचा संपर्क, व्यापार, त्यासंबंधीच्या कार्यप्रणाली, चर्चा पुन्हा सुरू करण्यात येण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या सगळ्याचा उद्देश हा देशांमधील संबंध सुधारणे आणि प्रगतीला गती देणे हाच असणार आहे. 

तणावाच्या परिस्थितीत उचलले होते ठोस पाऊल 

भारताने मागच्या वर्षी ओटावामधून आपले उच्चायुक्त आणि पाच अन्य राजनैतिक सदस्यांना परत बोलावून घेतले होते. कॅनडाने त्यांचा संबंध खलिस्तानी समर्थक  फुटिरवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र आता संबंध पुर्वपदावर येत आहेत. दोन्ही देशांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत,  उर्जा, उद्योग, डिजीटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता, अन्न सुरक्षा, महत्त्वाची खनिजे आणि पुरवठा साखळी यांसारख्या अनेक मुद्यांवर सहकार्य करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. 

G-7 संमेलनात पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांच्या मध्ये द्विपक्षिय बैठक, दहशतवाद आणि एआय मुद्यांवर चर्चा 

मिसरी यांनी सांगितले आहे की, दोन्ही देशांमध्ये सध्या बंद असणाऱ्या व्यापारावर चर्चा झाली. आपल्या अधिकाऱ्यांना सांगून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासंबंधीचे आदेस देण्यात आले. एकमेकांच्या संपर्कात रहात, पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन दोन्ही देशांच्या नेत्यांनी दिले आहे. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सुचित करण्यात आले आहे की, दोन्ही नेत्यांकडून आपापसात सन्मान, कायद्याचे शासन, क्षेत्रिय अखंडता यांच्याप्रती कटिबद्धतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!