Rishabh Panta

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. सोमवारी 23 जून रोजी या सामन्याचा चौथा दिवस असून यादिवशी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने शतक पूर्ण केलं, त्यापाठोपाठ ऋषभ पंतने सुद्धा शतकीय कामगिरी केली. यासह ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

क्रीडा : 2025-06-23

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीडस  मधील हेडिंग्लेच्या मैदानात सामना खेळवला जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. यात भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक ठोकले. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी 465 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे भारताने 6 धावांनी आघाडी घेऊन फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. यावेळी सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकलं. केएल राहुलने 202 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. राहुलनंतर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या इंनिंगमध्ये पुन्हा दमदार फलंदाजी करून ऋषभ पंतने भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासात नवा विक्रम केला.

ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास :

ऋषभ पंतने 130 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ऋषभने याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. तेव्हा लागोपाठ दोन इनिंगमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीय विकेटकिपरने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या विकेटकिपर फलंदाजाने 2001 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. ऋषभ पंतने शतक ठोकल्यावर तो पुढच्याच ओव्हरमध्ये शोएब बशीरच्या बॉलचा शिकार ठरला.

 

भारताची प्लेअर लिस्ट 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडचे प्लेअर लिस्ट 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!