Gold-silver Rate

Gold Rate Today : सध्या जगभरात काही देशांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्याचा परिणान जगभरातील आणि परिणामी देशातील व्यापारावर होत असतो. सोने-चांदीचे दर तर गेल्या काही दिवसात गगनाला भिडले आहेत. त्यात सध्या थोडी घसरण होताना दिसत आहे. सोनं, चांदीमध्ये नक्की किती रूपयांची घसरण झाली आहे ? ते जाणून घेऊ. 

राष्ट्रीय : 2025-06-24

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा बदल झाला आहे. मौल्यवान धातुच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. इस्राइल आणि ईराण या दोन्ही देशांत गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या दरम्यान MCXवर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घट झाली आहे. तर चांदी देखील 557 रुपयांनी घसरून 106206 रुपयांवर पोहोचली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय सोने दरावरही परिणाम

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात घसरण नोंदवली आहे. सोनं 30 डॉलरने घसरून 3360 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. तर चांदी एक टक्क्याने घसरून 36 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. या कारणामुळं गुंतवणुकदार आता जोखीम असलेल्या पर्यायंकडे वळत आहेत. सोनं-चांदीचे दर सोमवारी तेजीत होते. मात्र आज दरांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. आज भाव गडगडले आहेत. यामागे युद्धाचे परिणाम असल्याचे म्हटलं जातं आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घसरण झाली असून सोनं प्रतितोळा 99,870 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 91,550 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचे दर 610 रुपयांनी कमी झालं असून 74,910 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव?

ग्रॅम.            सोनं.                किंमत
10 ग्रॅम      22 कॅरेट           91, 550 रुपये
10 ग्रॅम      24 कॅरेट           99,870 रुपये
10 ग्रॅम      18 कॅरेट           74, 910 रुपये

ग्रॅम             सोनं                किंमत
1 ग्रॅम        22 कॅरेट          9,155 रुपये
1 ग्रॅम        24 कॅरेट          9, 987 रुपये
1 ग्रॅम        18 कॅरेट          7, 491 रुपये

ग्रॅम            सोनं                किंमत
8 ग्रॅम        22 कॅरेट         79, 896 रुपये
8 ग्रॅम        24 कॅरेट         73, 240 रुपये
8 ग्रॅम        18 कॅरेट        59, 928 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22  कॅरेट-   91, 550 रुपये
24  कॅरेट-   99,870 रुपये
18  कॅरेट-  74, 910 रुपये

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!