Gaza Peace Plan : डोनाल्ड ट्रंप यांनी गाजा युद्ध संपवण्याच्या दृष्टीने एक 20 सूत्रीय योजना सादर केली आहे. ही योजना इज्रायल ने स्विकारली आहे. हमासला ट्रंपने तीन-चार दिवसांचा अवधी दिला आहे. काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेऊ.
न्युयॉर्क : 30/09/2025
अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गाझापट्टीतील युद्ध समाप्त करण्याच्या दृष्टीने एक 20 कलमी योजना (Gaza Peace Plan ) सांगितली आहे. या योजनेता स्विकार इज्रायल कडून करण्यात आला आहे. हमास कडून निर्णय देणे अजून बाकी आहे. या सर्व घटनेत ट्रंपने हमासला उत्तर देण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी दिला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर हमासने या योजनेला मान्यता दिली नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागू शकतात.
डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी इज्राइल प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी केलेल्या बैठकीनंतर एक दिवसांनंतर मीडियाशी बोलणी केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आहे की, आम्ही शांतता करार योजना सादर केली आहे. हमासला यावर सहमती दाखवण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. जर त्यांनी या दिलेल्या मुदतीत हा करार मान्य करावा नाहीतर, त्यानंतरच्या वाईट परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे.
हमाससाठी परिणाम गंभीर असतील (Gaza Peace Plan )
डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितले की, या संबंधित सर्व देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता फक्त हमासने यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ट्रंप यांनी इशारा दिला आहे की, सर्व अरब देशांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सर्व मुस्लिम देशांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इज्रायल देशानेही स्वाक्षरी केली आहेत. आता फक्त हमासच्या स्वाक्षरीची वाट पहात आहोत. हमास एकतर स्वाक्षरी करेल, नाहीतर करणार नाही. जर स्वाक्षरी केली नाही तर, त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
एका अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, फिलिस्तानच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हमास ने फिलिस्तानशी राजनैतिक आणि सैन्याच्या नेतृत्वाशी विचारविनिमय करण्यास सुरूवात केली आहे. हे सर्व प्रकरण फार जटील आहे. यावर चर्चा करण्यास अनेक दिवस लागू शकतात.
ट्रंपना अरब देशांची साथ (Gaza Peace Plan )
ट्रंप यांना गाजा शांति योजनेसाठी सर्व अरब देशांसह भारताचाही पाठिंबा मिळाला आहे. ट्रंप यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सऊदी अरब, कतार, संयुक्त अरब अमीरात आणि पाकिस्तान या देशांचे आभार मानले. त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना प्रमुख आसिम मुनीर यांची प्रशंसा केली आणि त्यांना यावेळी महान व्यक्तिमत्व म्हणून संबोधीत केले. ट्रंप यांनी यावेळी पाकिस्तानने आम्हाला सुरूवातीपासून पाठिंबा दिल्याचे सांगितले.
Leave a Reply