Fourth Mumbai Mission, Big Announcement 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवी मुंबईतील विमानतळाचे उद्धाटन केले. यावेळी अनेक नवीन घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. काय आहेत या घोषणा जाणून घेऊ.
मुंबई : 08/10/2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. त्यामुळे आता मुंबईला दुसरं विमानतळ मिळाले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथ्या मुंबईची (Fourth Mumbai Mission) घोषणा केली आहे. चौथी मुंबई कोठे असणार आहे, हेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘हा एअरपोर्ट इंजिनिइरिंग मार्बल आहे. यासाठी डोंगर तोडावा लागला, नदीचा प्रवाह बदलावा लागला. त्यातून सुंदर एअरपोर्ट सुरू झाला. हा भारताच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. हा एक एअरपोर्ट आहे, त्यातून एक टक्का महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहेय वॉटर टॅक्सी इथे असेल. त्यातून गेटवेला जाता येणार आहे.
कोठे असेल चौथी मुंबई ? (Fourth Mumbai Mission)
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौथ्या मुंबई विषयी भाष्य केेले आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, ‘नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी मुंबई आणि वाढवण जवळ चौथी मुंबूई वसवण्यात येणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे रहाता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. त्यामुळे आगामी काळात या भागात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची उभारणी होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचे बजेट (Fourth Mumbai Mission)
नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज मुंबई मेट्रो लाईन -3 चेही लोकार्पण केले.
Leave a Reply