Donald Trump

Elon Musk Quits Trump Special Advisor Role : ट्रम्प यांचा विशेष सल्लागार म्हणून एलॉन मस्क काम बघत होते. मात्र आता त्यांचा या पदाचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. तसे सोशल मीडियावरून त्यांनी जाहिर केले आहे. 

आंतरराष्ट्रीय : 2025-05-29

एलॉन मस्क  (Elon Musk ) यांनी ट्र्म्प यांच्या विशेष सल्लागार पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढील काळात ते या पदावर कार्यरत नसतील. त्यांनी बुधवारी आपल्या सोशल मीडिया अकांउंट वरून तसे घोषीत केले आहे. आपण आपला प्रशासकिय  विभागाचा विशेष सल्लागार प्रमुख म्हणून आपला कार्यकाळ पुर्ण केला आहे. यात त्यांनी ट्र्म्प सरकारचे आभार मानले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या प्रशासना कारभारात मला विशेष कर्मचारी म्हणून स्थान दिले. 

डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) जवळचे मानले जाणारे एलॉन मस्क यांनी घोषणा केली की, मी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनामधून बाहेर पडत आहे. मस्क यांनी प्रशासनातील संघीय नोकरशाही कमी करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु आता ते राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार हे पद सोडत आहेत. 

टेस्ला कंपनीचे प्रमुख असणाऱ्या एलॉन मस्क यांचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध फार ठिक नाहीत अशी चर्चा सुरू होती. मस्क यांनी काही दिवासंपूर्वीच ट्रम्प यांच्या एका निर्णयावर टिका केली होती. त्यांनी म्हटले होते की, ट्रम्प यांचा निर्णय निराशाजनक आहे, ज्याने सरकारी खर्चात वाढच होणार आहे. ज्याने प्रशासनावरील भार वाढून, तोटा होणार आहे. 

उधळपट्टी कमी करण्याची संधी मिळाली 

मस्क यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, त्यांचा विशेष सरकारी कर्मचारी म्हणून कार्यकाळ संपला आहे. ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतात, कारण त्यांनी प्रशासनाकडून होणारी उधळपट्टी कमी करण्याची संधी मला दिली. मस्क पुढे म्हणाले की, DOGE मिशन दिवसेंदिवस अधिकच मजबूत होईल. यामुळे सरकार चालवण्याची एक नविन पद्धत विकसित होईल. 

काही निर्णयांमुळे नाराजी 

ट्र्म्प सरकारने टॅक्स मध्ये केलेल्या कपातीमुळे आणि इमिग्रेशनमधील सुधारणा धोरणांमुळे मस्क नाराज होते. त्यांनी सीबीएसशी बोलताना म्हटले होते की, कोणतेही बील हे एकतर मोठे असते फार किंवा छान, दोन्हीही ते असू शकत नाही. काही निर्णयांमुळे मी नाराज आहे. मात्र काही निर्णय मोठे बदल घडवतील म्हणून मी उत्साहित सुद्धा आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!