Saint Tukaram Maharaj Palakhi Sohala, Devendra Fadanavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली आहे. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवी, यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला.
देहू : 2025-06-18
संत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. याचदरम्यान एक मोठी घटना येथे घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देहूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ड्रोन पडण्याची घटना घडली. हा ड्रोन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanavis ) यांच्यापासून अवघ्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर पडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ड्रोन खाली पडल्यानंतर पोलिसांकडून तो जप्त करण्यात आला आहे.
आजपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली आहे. पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. याचदरम्यान ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. याचदरम्यान हा ड्रोन पडला. हा ड्रोन जप्त करण्यात आला आहे.
ड्रोनद्वारे होत होते चित्रिकरण
आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाल्यावर. या पालखी चित्रिकरण ड्रोनच्या माध्यमातून केलं जाते. पालखीचे चित्रिकरण सुरू असतानाच हा ड्रोन खाली कोसळल्याची घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ अवघ्या पाच ते दहा फूट अंतरावर हा ड्रोन खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला.
Leave a Reply