Delhi School Bomb Threatदिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले (फोटो- प्रतिकात्मक आहे)

Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने घबराट पसरली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

दिल्ली : 13-02-2026

राजधानी दिल्लीतील काही शाळांमध्ये (Delhi School Bomb Threat) आज (13 फेब्रुवारी ) सकाळी बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर घबराट पसरली. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने कारवाईला लागल्या. बॉम्ब पथके आणि पोलीस कर्मचारी विविध शाळांमध्ये पोहोचले आहेत आणि असून शोध मोहीम सुरू आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, झंडेवालन येथील बीडी तमिळ एज्युकेशन स्कूलमध्ये प्रथम बॉब्मची धमकी मिळाली. त्यानंतर, इतर शाळांमधूनही अशाच प्रकारच्या धमक्या येऊ लागल्याचे वृत्त येऊ लागले. जलगदीने कारवाई करत पोलिसांनी सर्व संवेदनशील शाळांना सतर्क केले आणि सुरक्षा कडक केली.

सध्या, दिल्ली पोलिसांचे पथके आणि बॉम्ब पथके शाळांच्या आत आणि आजूबाजूला कोणत्याही संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत. मुलांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, खबरदारी म्हणून अनेक शाळा रिकामी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांना शांत राहण्याचा आणि सुरक्षा मार्गर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत आणि धमकीच्या कॉलचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एखाद्या संघटित टोळीचे काम आहे की एखाद्या व्यक्तीने पसरवलेली अफवा आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांना पहिला फोन कधी आला ?  ( Delhi School Bomb Threat )

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर, पोलिस पथके तपासणीसाठी ठिकाणी पोहोचली आहेत. या धमकीबाबतच्या पहिला फोन सकाळी 9:13 वाजता झंडेवालन येथील बीडी तमिळ एज्युकेशनला आला होता. मिळालेल्या, माहितीनुसार, त्यानंतर इतर शाळांमधूनही अशाच प्रकारच्या धमक्या आल्याची माहिती मिळाली.

प्रकरणाचा तपास सुरू (  Delhi School Bomb Threat )

प्रकरणाचा गांर्भिय लक्षात घेता, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि धमकीच्या कॉलचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!