Covid Update 2025 : सध्या जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचे पेशंट दिसून येत आहे. भारत, चीन सारख्या आशियाई देशांसह आता अमेरिकेतसुध्या कोरोना व्हायरसची लागण झालेले पेशंट दिसून येत आहेत. त्यामुळे परत एकदा सर्व जगाला कोरोना वेढणार का ? हा प्रश्न पडला आहे.
आरोग्य : 2025-05-28
कोरोना व्हायरसचा परिणाम परत एकदा जगभरात दिसून यायला सुरूवात झाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना -19 च्या केसेस वाढत आहेत. भारतात सध्या कोरोना पेशंटच्या सक्रिय केस या एक हजाराच्या वर आढळून आल्या आहेत. यातच आता अमेरिकेतून एक याबाबत गंभीर वृत्त समोर येत आहे. सेंटर फॉर डीसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशन (CDC) च्या रिपोर्ट नुसार अमेरिकेत प्रत्येक आठवड्यात सुमारे 350 लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोना व्हयरसच्या संक्रमणाचा धोका परत एकदा खुप वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचा एक नविन व्हेरियंट दिसून आला आहे. यातील ओमिक्रोन JN.1, त्याचा सब व्हेरियंट LF.7 आणि NB.1.8 हे व्हेरियंट जास्त संक्रमित करणारे आहेत. एका रिपोर्टनुसार चीन आणि आशियातील काही क्षेत्रांमधील कोरोना व्हायरस वाढण्यामुळे अजून जास्त घातक वेरियंट निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेतील वाढती रूग्ण संख्या
अमेरिकेतील विमानतळांवर कोविडचा नवा व्हेरियंट NB.1.8.1 आढळून आला आहे. CDC चे विमानतळावरील टेस्टिंग सहयोगी जिन्कगो बायोवर्क्स द्वारा जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, हा व्हेरियंट आंतरराष्ट्रीय प्रवासींमध्ये विशेषतः कॅलफोर्निया, वॉशिंग्टन राज्य, व्हर्जिनीया आणि न्युयॉर्क शहर येथील विमानतळांवर आढळून आला आहे. तिकडे हॉंगकॉंग आणि तायवान मध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, येथील हॉस्पिटल आणि आपत्ककालीन कक्षांमध्ये रूग्णांची संख्या वाढत आहे. ज्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी लोकं मास्क वापरायला लागले आहेत.
चार आठवड्यात सरासरी 350 जणांचा मृत्यू
सेंटर फॉर डीसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशन (CDC) द्वारा दर आठवड्याला कोविड – 19 संक्रमित मृत्यू झालेल्यांची आकडेवारी जाहीर केली जाते. त्यात एप्रिल 2025 मध्ये चार आठवड्यात सरासरी 350 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान पहिल्या आठवड्यात 406 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात 353 जणांची नोंद , तिसऱ्या आठवड्यात 368 जणांच्या मृत्यूची नोंद आणि चौथ्या आठवड्यात 306 लोकांचा मृत्यू झाल्याती नोंद करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघनेेने (WHO ) ने SARS-CoV-2 या व्हेरियंटचा NB.1.8.1 या व्हेरियंटला जास्त लवकर पसरवत असल्याने या व्हेरियंटला ‘वेरियंट अंडर मॉनिटरिंग’ या श्रेणीत समाविष्ट केले आहे. हा व्हेरियंट XDV. 1.5.1 पासून उत्पन्न झाला आहे. त्याचा पहिला नमुना 22 जानेवारी 2025 ला सापडला.
भारतातही कोरोनाच्या केसमध्ये वाढ
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे सांगण्यात आले आहे की, 19 मे नंतर कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. सध्या भारतात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1 हजार पेक्षा जास्त आहे. ज्यातील 753 केस 19 मेच्या नंतर आढळून आल्या आहेत. कोरोना बाधीतांच्या सर्वात जास्त केस महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि अन्य काही राज्यांमध्ये दिसून येत आहेत .
Leave a Reply