चार पाच तासापूर्वी करण्यात आलेली युद्धबंदी पाकिस्तानकडून मोडण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय : 2025-05-10
अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर भारत पाकिस्तान यांनी युद्ध बंदी करण्याचा निर्णय घोषीत केला होता. मात्र त्यानंतर काही तासात पाकिस्तानने आपला शब्द मोडत (Ceasefire violation by Pakistan ) जम्मू येथे गोळीबार सुरू केला. जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसले आहेत. तसे फोटो आणि व्हिडीयो जम्मूकश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शेअर केले आहेत.
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार तासात पाकिस्तानकडून बारामुल्ला आणि राजौरी परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. युद्दबंदीनंतर पाकिस्तानने हे कृत्य केल्याने जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारताने याला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे, पाकिस्तानकडून झालेल्या शस्रसंधीचे उल्ल्ंघन झाल्यानंतर श्रीनगरमध्येही स्फोटाते आवाज ऐकू आले. जम्मूमध्ये जसे ड्रोन दिसले, तसेच ड्रोन राजस्थानमध्येही दिसले असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
Leave a Reply