Soldier Purnam Kumar Sahu

बीएसएफ कॉंन्सेबल पूर्णम कुमार साहू ( BSF Soldier Purnam Kumar Sahu ) भारतात परत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. पाकिस्ताच्या रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. 

राष्ट्रीय : 2025-05-14

बीएसएफ कॉंस्टेबल पूर्णम कुमार साहू ( BSF Soldier Purnam Kumar Sahu ) अखेर भारतात परत आले आहेत. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पूर्णम कुमार हे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांना मायभूमीत परत आणण्यासाठी भारताच्या रक्षा मंत्रालय आणि भारताच्या इतर पातळ्यांवरही जोरदार प्रयत्न सुरू होते. पंजाबच्या फिरोजपुर सेक्टरमध्ये तैनात असणाऱ्या 40 वर्षीय साहू 23 एप्रिलला आंतराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तिथे त्यांना पाकिस्तानच्या रेंजर्सने ताब्यात घेतले होते. 

182 च्या बटालियन मध्ये तैनात होते पूर्णम साहू 

बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , पूर्णम साहू हे काही शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी तेथे तैनात होते. त्यावेळी ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी एका झाडाखाली आराम करण्यासाठी जात असताना, अनवधानाने ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या रेंजर्सने त्वरीत ताब्यात घेतले होते. पूर्णम साहू पंजाब मधील फिरोजपुरमधील सीमेवर 182 व्या बटालियन मध्ये तैनात होते. 

कशी ओलांडली गेली  हद्द 

श्रीनगरमधील बीएसएफ च्या 24 व्या बटालियनची नियुक्ती ममदोटमध्ये तैनात केली गेली आहे. बुधवारी सकाळी काही शेतकरी गव्हाच्या कापणीसाठी आपले पिक कापणी करण्याचे कंबाईन मशीन घेऊन निघाले होते, जे क्षेत्र भारत पाक सीमारेषेच्या तोंडावर असणाऱ्या गेट क्रमांक 208/1 च्या नजिक होते. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले दोन जवानही त्यांच्यासोबत त्यावेळी होते. याचदरम्यान पूर्णन साहू हे नजरचुकिने सीमापार करून पलिकडे गेले. त्याचवेळी पाकिस्तानच्या रेंजर्सने त्यांचे हत्यार काढून घेऊन त्यांना ताब्यात घेतले. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!