Rahul Gandhiराहुल गांधी यांना भर टिव्ही शोमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लाईव्ह टीव्हीवर गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोण आहे हा नेता ? कॉंग्रेस पक्षाकडून गृहमंत्र्यांना हे कळवण्यात आले आहे.

दिल्ली : 29/09/2025

कॉंग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एका टिव्ही डिबेट शोच्या दरम्यान त्यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेने राजकीय वर्तूळात भूकंप आला आहे. एबीवीबी चे एक नेते यांनी अशी खुलेआम धमकी दिली आहे. एका शो दरम्यान हा नेता बरळला आहे की, राहुल गांधी यांच्या छातीत गोळी मारली जाईल’. या घटनेमुळे कॉंग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत, कॉंग्रस पक्षाकडून गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे कळवून, कारवाईची मागणी केली आहे. पक्षाचे सचिव केसी वेणुगोपास यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही धमकी केरळमधील एक मल्याळम टीवी चॅनलवर सुरू असणाऱ्या चर्चेदरम्यान भाजपाचे प्रवक्ता आणि एबीवीपीचे पूर्व प्रदेश अध्यक्ष प्रिंटू महादेव यांनी ही धमकी दिली आहे. कॉंग्रेसने आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, जर सरकारने कोणती कठोर कारवाई याविरोधात केली नाही तर, आम्ही असे समजू की विरोधी पक्ष नेत्याच्या विरूद्ध हिंसेला सरकारची मौन संमती आहे.

खुलेआम धमकी, एक षडयंत्र (Rahul Gandhi)

केसी वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मी या धमकीला ‘चुकून बोलण्यात आलेले शब्द’ किंवा ‘जीभ घसरली’ इतकी क्षुल्लक बाब समजण्याची चूक करणार नाही. विरोधी पक्षनेत्याला दिलेली ही विचारपूर्वक धमकी आहे. कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, हिंसा भडकवणे हे एक बेशरम कृत्य आहे. महादेवने सगळ्यांसमोर घोषणा केली की, ‘राहुल गांधी’ च्या छातीत गोळी मारू ‘. अशा पद्धतीचे विषारी विधानं राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण करू शकतातच, मात्र ते देशाच्या संविधान आणि कायद्यालाही कमकुवत बनवतात.

जर कारवाई केली नाही तर … (Rahul Gandhi)

कॉंग्रेस पक्षाने आपल्या पत्रात कडक शब्दात निषेध व्यक्त करत या सर्व प्रकरणात कोणतीही बेपर्वाही सहन केली जाणार नाही असे म्हटले आहे. वेणुगोपाल यांनी सांगितले आहे की, मी याधीही राहुल गांधींची सुरक्षा बघणाऱ्या सीआरपीएफ ला सांगितले आहे की त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. एक सत्तारूढ पक्षाच्या नेत्याने अशी उघड धमकी देणे, म्हणजे हे मोठे षडयंत्र असू शकते. जर यावर कडक कारवाई केली गेली नाही, तर सत्तारूढ पक्षाची अशा हिंसेला मूक संमती असल्याचे समजण्यात येईल.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!