Pune Accident

पुणे शहर भीषण अपघाताने हदरले आहे. मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना या अपघातात उडवले आहे. हे सर्वजण पुण्यातील विद्यार्थी असल्याचे समजते.

पुणे : 2025-05-31

पुणे शहरात एका मद्यधुंद कार चालकाने बारा जणांना उडवले आहे. हे बाराही जण एमपीएसीचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे.  या घटनेतील सर्व जखमींना पुण्यातील संचेती हॉस्पिटल आणि योगेश हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सदर कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

शहराच्या मध्यवर्ती सदाशिव पेठेतील भागात हा अपघात झाला. भावे हायस्कूल जवळ एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी ( 31 मे ) ला सायंकाळी पावणे सहा वाजता घडली. यात जखमींना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी पुण्यात एमपीएसीची तयारी करण्यासाठी आले आहेत. यातील चारजणांना फ्रॅक्चर झाल्याने संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरितांना मोडक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 

चालक जयराम शिवाजी मुळे (वय 27 राहणार बिबेवाडी ) याला विश्रामबाग पोलिंसांनी ताब्यात घेतले आहे. कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. जखमी विद्यार्थी सदाशिवपेेठेतील चहाच्या टपरीवर रोजच्या रुटीननुसार चहा पित होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने इतक्या लोकांना उडवले.  12 जणांपैकी 4 जणांना फ्रॅक्चर असून बाकी 9 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. कारचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून रूग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!