BJP Government : ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे.
राष्ट्रीय : 2025-06-10
केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात 11 वर्षे पुर्ण झाली आहेत. या काळात झालेल्या विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे. मोदी सरकारने गेल्या 11 वर्षात विकासकामे केली याबाबत त्यांनी माहिती दिली.
या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले की, ‘आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताकडे जाण्याची 11 वर्षे आहेत. परिवर्तनशील दशक पूर्ण करत एका दशकाची वाटचाल ही आहे. मोदीजींच्या सरकारचं एक वर्णन केलं तर पारदर्शकता, निर्णयशीलता आणि निश्चयकरणगीवर वाटचाल आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात रेल्वेचे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. जुनं युपीएचं सरकार होतं तेव्हा 10 वर्षात जो निधी दिला तितका निधी एकाच वर्षात मोदी सरकारनं दिला. 6 लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं झाली आहेत. 1 लाख घरं देण्याचा विक्रम केला. जी यादी होती ती सर्व समाप्त होत आहे. नवीन यादी तयार करत सर्वेक्षण करण्यास सांगितलं आहे. अशाने जे सुटले असतील त्यांना देखील घरं मिळेल. विक्रमी घरं दिल्याबद्दल आभार मानतो.
Table of Contents
55 कोटी जनधन खाती
मोदी सरकारने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला, जनतेला मोफत अन्नधान्य दिलं जातयं. मोदी सरकार येईपर्यंत नळ जोडणी कमी होती ती आता 15 कोटींवर गेली आहे. पीएम स्वनिधीचा लाभ मिळाला. 52 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा कर्ज मिळाले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचे काम केले आहे. 55 कोटी जनधन खाती, अन्न सुरक्षा 51 कोटी, जीवन ज्योती 23 कोटी आयुष्यमान 77 कोटी खाते तयार केली आहेत आणि आरोग्य लाभ दिले आहेत. आतापर्यंत थेट मोदी सरकराने महाराष्ट्राला लाभ दिले ही संख्या 43 लाख कोटी रूपयांपर्यंत जाते आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय
सर्वसमावेशक चेहरा मोदी सरकारने दिला आहे. 60 टक्के मंत्री एसटी आणि ओबीसी वर्गातले आहेत. समाजातील वंचित घटकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचा प्रयत्न केला. देशाचे बजेट शेतकऱ्यांना 1 लाख 37 हजार कोटी रुपये गेले आहे. 2009 च्या निवडणुकीत 80 हजार कोटींची माफी केली आहे. आम्ही मात्र 3 लाख 7 हजार कोटी रूपये थेट खात्यात दिले आहेत. जवळपास 25 हजार कोटी रुपये सिंचन प्रकल्पात दिले आहेत. एमएसपीत सातत्याने वाढ करण्यात आलेली आहेत. तांदुळ 2303 रुपयांपर्यंत गेला आहे. दूध उत्पादन 23 कोटी टनापर्यंत गेलं. मध निर्यात 11 वर्षात तिप्पट झाली आहे. सौर पंप मोदी सरकार येईपर्यंत 1 लाखापर्यंत कमी होते मात्र आता 10 लाख पर्यंत गेले आहेत. सहकार मंत्रालय पहिल्यांदा सुरू झालं. राष्ट्रीय सहकार धोरण देखील सरकारनं आणलं. 50 वर्षात साखर कारखान्यांना न झालेली मदत मोदी सरकारनं दिली. एनसीडीसी मार्फत 55 हजार कोटी साखर कारखान्यांना दिले.
महिलांसाठी खास धोरणं
नारी शक्ती संदर्भात 33 टक्के आमदार खासदार असणार आहे. याबाबत कायमस्वरूपी धोरण आणले. नियंत्रण रेषेवर पहिल्यांदा महिलांची तुकडी तैनात करण्याचे काम करण्यात आले आहे. 73 टक्के घरं महिलांच्या नावावर आहेत. लखपती दीदी 3 कोटी तयार झाल्यात, 1 कोटी महाराष्ट्राने बनवण्याचे ठरवले आहेत. 90 लाख महिलांचे बचत गट तयार करत त्यांना आर्थिक सक्षम करण्यात आले आहे. माता मृत्यू दर 80 पर्यंत खाली आहे.
युवकांचा विचार करत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं आहे. मूळ तत्व कायम ठेवत शिक्षण वैश्विक करण्याचे प्रयत्न आहेत 8 नवीन आयआयएम झालेत. 490 नव्या विद्यापीठांची स्थापना केली आहे. 18-28 गटातील 3 कोटी मुलांचे ईपीएफओ अकाऊंट झाले आहेत. 12 लाखांपर्यंत करमुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. 2014 आधी 5 शहरात मेट्रो होती, मात्र आता 23 शहरात मेट्रो नेटवर्क आहे.
चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
ऑपरेशन सिंदूर स्वाभिमानी म्हणून ओळखलं जाईल, संरक्षण दलासाठी केंद्र सरकारनं 24 हजार कोटी रुपयांपर्यंत खरेदी केली आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी नफ्यात आहेत. आपण निर्यात करतोय. 74 टक्के एफडीआय संरक्षण क्षेत्रातून आलेला आहे. भारतीयांचे महत्त्व ओळखून त्याप्रकारचे काम केले आहे. जपानला जमलं नाही ते आपण केलं. चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहोत. लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ. अर्थव्यवस्था 6.3 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारताचा विकास दर सर्वाधिक राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये 6 टक्के वाढ होत निर्यात आहे. 51 टक्के स्टार्टअप आता टीअर 2 आणि 3 मध्ये जात आहेत हे मोठे यश आहे. आधी 74 विमानतळं होती ती आता 160 झाली आहेत . वंदे भारत 136 आहेत त्या लवकरच 400 पर्यंत जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचे परिवर्तन मोदीजींमुळे झाल्याचं पहायला मिळते. 40 वर्ष अडकलेलेे प्रकल्प देखील खुले झालेत. प्रगतशील आणि सर्वसमावेशक सरकार दिल्याबद्दल मोदीजींचे आणि मंत्रिमंडळाचे आभार.
Leave a Reply