Chinnaswamy Stadium

Chinnaswami Stadium : आयपीएल 2025 चॅम्पियन आरसीबीचा (RCB) विजयोत्सवाला चांगलेच गालबोट लागले. आरसीबी टीमच्या स्वागतीसाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन सुमारे 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. स्टोडीयममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार उघडताच चाहत्यांमध्ये एकच झुंबड उडाली. या सर्व गडबडीत चेंगराचेंगरी होऊन 8 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण घटनेत एकुण 8 जणांना आपले प्रणा गमावले तर 40 जण जखमी झाले आहेत. 

चिन्ना्स्वामी (Chinnaswami Stadium)  स्टेडीयम बाहेर लोकांची इतकी गर्दी होती, की लोकं स्टेडियमच्या बाहेर भिंतीवरून उडी मारून आत जाण्यासाठी धडपडत होते. काहीजण तर झाडांवर चढून प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. हा सर्व प्रकार स्टेडियमच्या गेट क्रमांक 1 वर घडला. स्टोडीयममध्ये पोहोचण्यापूर्वी आरसीबीचे खेळाडू विधानसभेत पोहोचले होते. जिथे मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंचा सन्मान केला. त्यानंतर खेळाडू स्टोडियम कडे रवाना होत होते. या सर्व दुर्दैवी प्रकारावेळी खेळाडू तिथे पोहोचले नव्हते.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!