AYUSH Admission 2026 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे AYUSH अभ्यासक्रमांच्या (BAMS, BHMS, BUMS) प्रवेशासाठी विशेष चौथ्या फेरीची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : 17-11-2026
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-2027 च्या (AYUSH Admission 2026) प्रवेशासाठी आयुष वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या आयुर्वेद-बीएएमएस (BAMS), होमिओपॅथी-बीएचएमएस (BHMS) वयुनानी -बीयुएमएस (BUMS) या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागा वाटपाच्या तिसऱ्या फेरीनंतर बुलढाणा येथे नवीन शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाला प्रथमच प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यामुळे वस्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा कऱण्याची परवानगी नसल्यामुळे उच्च गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना नवीन सरकारी महाविद्यालयात संधी मिळणार नाही.
Table of Contents
यामुळे राज्य सरकारने प्रवेशासाठी विशेष चौथी कॅप फेरी आयोजित केली होती. (AYUSH Admission 2026)
यानुसार चौथी यादी जाहीर करण्यात आली. या चौथ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात 208 आयुष महाविद्यालयात 14 हजार 205 जागांपैकी 11 हजार 591 जागेवर तिसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. 1 हजार 979 विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर 635 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. स्ट्रे राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बीएएमएसमध्ये (BAMS) 1277 विद्यार्थ्यांना संधी (AYUSH Admission 2026)
आयुर्वेद-बीएएमएस ( BAMS) या अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात 141 वैद्यकीय महाविद्यालयात 9 हजार 579 जागांपैकी 8 हजार 151 विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत 1 हजार 277 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये 151 जागा रिक्त आहेत. यामध्ये 24 शासकीय महाविद्यालयात 222 व 117 खासगी महाविद्यालयात 1055 विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
बीएचएमएसमध्ये (BHMS) 670 विद्यार्थ्यांना संधी (AYUSH Admission 2026)
होमिओपॅथी -बीएचएमएस (BHMS) या अभ्यासक्रमांच्या चौथ्या यादीत, राज्यात 59 वैद्यकीय महाविद्यालयात 4 हजार 196 जागांपैकी 3 हजार 42 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत 670 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये 484 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2 शासकीय महाविद्यालयात 30 व 57 खासगी महाविद्यालयात 640 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
बीयुएमएसमध्ये (BUMS) 32 विद्यार्थ्यांना संधी (AYUSH Admission 2026)
युनानी-बीयुएमएस (BUMS) या अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात 8 वैद्यकीय महाविद्यालयात 430 जागांपैकी 398 विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत 32 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये 3 शासकीय महाविद्यालयात 1, 5 खासगी महाविद्यालयात 31 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2026 सायंकाळी 5:30 पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित कऱणे आवश्यक आहे.