Australian Government Dicisionअल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव ( फोटो क्रेडिट-सोशल मीडिया)

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडियावर येण्यासाठी मज्जाव कऱण्यात आला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. जाणून घेऊयात या निर्णयाविषयी.

ऑस्ट्रेलिया : 10/12/2025

आजचा जमाना हा सोशलमीडियाचा आहे असे म्हटले जाते. आजकाल कोणाचेही सोशलमीडिया प्लॅटफॉर्मशिवाय पान हलत नाही. अशावेळी ऑस्ट्रेलियात एक मोठा निर्णय (Australian Government Dicision) घेतला आहे. कारण आजपासून म्हणजेच 10 डिसेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये टिकटॉक, युट्युब आणि मेटाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या मोठ्या ॲप्सव्यतिरिक्त थ्रेडस, एक्स, स्नॅपचॅट, किक, ट्विच आणि रेडिट प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे. या सर्व प्लॅटफॉर्म्सना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पालन करणं अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियातील सरकारचे असे म्हणणं आहे की, 16 वर्षांपेक्षा कमी वय असेलल्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन कऱण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या निर्णयामुळे तरूणांचे सोशल मीडियावरील हानीकारक मजकुरामुळे संरक्षण होणार आहे.

ऑस्ट्रेलियातील सरकारने घेतलेल्या या निर्णयावर एलन मस्कच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने देखील प्रतिक्रीया  दिली आहे. एक्सचे म्हणणे आहे की, ते ऑस्ट्रेलियातील सोशल मीडिया बॅन निर्णयाचे पालन करणार आहे. याशिवाय फेसबुक, युट्युब आणि टिकटॉक सारखे इतर प्लॅटफॉर्म देखील आता टीनएजर्स यूजर्सना काढून टाकण्यासाठी तयार झाले आहेत.

या प्लॅटफॉर्मवर नसणार बंदी  (Australian Government Dicision)

डिस्कॉर्ड, गूगल क्लासरूम, मेसेंजर, गिटहब, व्हॉट्सॲप, लेगो प्ले, स्टीम, रोब्लॉक्स आणि युट्युब किडस सारख्या प्लॅटफॉर्मवर बंदीचा कोणताही परिणाम होणार नाही. हे प्लॅटफॉर्म अजूनही लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या ई-सेफ्टी अधिकाऱ्याने सांगितले आहे की, काही प्लॅटफॉर्मवर अजूनही विचार केला जा आहे, बॅन कऱण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मची ही अंतिम यादी नाही.

यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयानंतर आता सोशल मीडिया  प्लॅटफॉर्म्सना एज-रिलेटेड सिग्नल्सची वेगवेगळ्या स्तरावर चाचणी करावी लागणार आहे. ज्यामध्ये अकांऊट किती जुने आणि प्रोफाईल फोटोवरून वय ओळखणं इत्यादी गोष्टी असणार आहेत. लहान मुलांच्या कंटेटवरही देखरेख ठेवली जाणार आहे.

 ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान काय म्हणाले ?(Australian Government Dicision)

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असताना, माझ्यासाठी हा एक अतिशय अभिमानाचा दिवस आहे. कारण जागतिक स्तरावर पहिल्यांदाच, देशात 16 वर्षांखालील लोकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियातील तरूण वर्गाचा विचार केला तर काहींना हा अपमान वाटत आहे, तर काही मुलांचे म्हणणं आहे की, ते लवकरच यामधून बाहेर पडू शकतील. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास आई-वडील आणि मुलांना कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही. मात्र कंपन्यांना या उल्ल्ंघनासाठी 49.5 मिलियन ऑस्ट्रेलिया डॉलर म्हणजेच 32 मिलियन युएस डॉलर म्हणजेच 25 मिलियन पाउंडचा दंड भरावा लागणार आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!