Ashadhi Wari Palkhi 2026 : संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असतो. त्या मुक्कामसाठी जागा पुरेशी असावी, ती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
पुणे : 24-02-2026
आळंदी, देहू या येत्या आषढी वारी पालखी सोहळ्याच्या (Ashadhi Wari Palkhi 2026) पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे 15 मे पूर्वी पूर्ण करावीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांनी दिली. देहू व आळंदी संस्थांनांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
देहू ते देहू रस्ता या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या रूंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील तीन किलोमीटर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दोन किलोमीटरचे काम संबंधित संस्थेमार्फत पूर्ण करावे, असे निर्देश दिले. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा कऱण्यात येईल, असे सांगितले. देहू येथील मंदिरापर्यंतचा सुमारे 500 मीटर रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण कऱणार आहे.
कोठे असतो मुक्काम ? (Ashadhi Wari Palkhi 2026)
संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे होत असल्याने जागेअभावी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याबाबत संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. काळभोर नगर ते आकुर्डी येथील मेट्रोचे काम पालखीपूर्वी पूर्ण करावे. तसेच लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवून देण्यात येईल. गवळ्याची उंडवडी, सणसर व निमगाव केतकी येथील पालखी मुक्कामाच्या जागेचा प्रश्न प्रशासनामार्फत सोडविण्यात येईल, असेही स्पष्टल केले.
आळंदी संस्थानाकडून आलेल्या मागण्यांबाबतही ठोस भूमिका घेत प्रशासनाला मुदत निश्चित करून कामे पूर्ण कऱण्याच्या सूचना दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील संचेतीपासून एफ.सी. रोडपर्यंत रात्री अखंडीत प्रकाश व्यवस्था राहिल याची खात्री कऱण्याचे निर्देश दिले. बोरावके मळा ते सासवड दरम्यान नव्याने झालेल्या बायपास मर्गावरील अडथळे दूर करण्यात येतील.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, किरण इंदलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी , पालखी मार्गावरील संंबंधित विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते. नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गणेश मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान देहू व योगी निरंगनाथ, विश्वस्त, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण करा (Ashadhi Wari Palkhi 2026)
निरा येथील जुना पूल तात्काळ पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. आळंदी येथील प्रलंबित रस्त्यांची कामे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्धता तसेच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीपर्यंतच्या मोठ्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. आळंदी नगरपालिका क्षेत्रातही रस्ते रूंदीकरणाची कार्यवाही अधिक वेगाने पूर्ण कऱण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
पालखी सोबत क्रेनची व्यवस्था ठेवावी (Ashadhi Wari Palkhi 2026)
दिवेघाट येथे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकडस उभारण्यात येतील. पालखी मार्गावर कोणतीही वाहने बंद पडल्यास वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पालखी सोबत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची दक्षता प्रशासन व पोलीस विभाग घेतील. परतीच्या वारीदरम्यान आवश्यकतेनुसार रूग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीत आळंदी व देहू संस्थानांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केेले.