Ajitdada Pawar : वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकी वैद्यकीय रूग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रूग्णालय, बारामती ” असे करण्यात आले आहे.
बारामती : 03-03-2026
वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय रूग्णालय, बारामती याचे नामांतर “स्व. अजित (दाद ) पवार (Ajitdada Pawar) सर्वोपचार रूग्णालय, बारामती” असे करण्यात आले आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती आणि शासकीय आयुर्वेद रूग्णालय, बारामती यांचे नामांतर ” स्व. अजित (दाद) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय, बारामती” असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
शासन निर्णयात नमूद केल्यानुसार, स्व.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरिय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार करणे यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण केले.
त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला लक्षणीय गती मिळाली. (Ajitdada Pawar)
वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे शासनाने नमूद केले आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रूग्णालयांचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी (Ajitdada Pawar)
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हवाई तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मोठी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारामती विमानतळाचे नामकरण ‘अजित पवार विमानतळ, बारामती ‘ असे करण्यात यावे, अशी मागणी हवाई तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.