Aditi Parthe ZP Studentअदिती पार्थे या भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची 'नासा' भेटीसाठी निवड झाली आहे.

Aditi Parthe : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना, एका चिमुकलीने थेट नासापर्यंत भरारी घेतली आहे. समाजातील अनेकांसाठी तिची ही कहानी प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकरणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीची नासात निवड झाली आहे. जाणून घेऊयात तिचा प्रवास.

पुणे : 13/10/2025 

पुण्यातील भोर तालुक्यातील अदिती पार्थे (Aditi Parthe ZP Student) हिच्या ‘नासा’ पर्यंत धडक मारण्याचा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. राज सकाळी 9 वाजता ती शाळेत जाण्यासाठी तयार होते. सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता तुडवत अदिती निगुडाघर जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते. संध्याकाळी 5 वाजता ती परत येताना तेव्हढेच अंतर चालत येते. तिचा सांभाळ तिच्या मामा-मामीच्या घरी केला जात आहे. मामा आणि तिचे वडील पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये रोजंदारीवर काम करतात. तर आई आणि तिचा भाऊ तिच्या वडिलांच्या गावी राहून त्यांचा चरितार्थ चालवतात. अशा या परिस्थीतीतून या मुलीने नासा सारख्या संस्थेत जाण्यासाठी प्रवेश मिळवला आहे.

घरात ना स्मार्ट फोन, ना कॉम्पुटर (Aditi Parthe ZP Student)

विशेष म्हणजे तिच्या घरात कोणाकडेही स्मार्ट फोन नाही. शाळेतही चांगले कॉम्पुटर नाहीत. असे असतानाही जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येणाऱ्या नासा भेटीच्या उपक्रमासाठी तिची निवड झाली आहे. अशा 25 हुशार मुलांमध्ये अदिती पार्थेची निवड झाली आहे.खेड्यातून रोज पायी खडतर प्रवास करत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून तिने ही निवड साध्य केली आहे.

इंटर-युनिव्हर्सिंटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) च्या सहकार्याने, ऑगस्टमध्ये संपणाऱ्या तीन टप्प्यांच्या चाचण्यांमधून इयत्ता 6 वी आणि 7 वी मधील 75 झेडपी शाळांच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . यापैकी 50 विद्यार्थी 6 ऑक्टोबर रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तिरूअनंतपूरम येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. इतर 25 विद्यार्थी नासाला जाणार आहेत. सातवीत शिकणाऱ्या अदितीने आजपर्यंत ट्रेनही पाहिलेली नाही. तीने कधीही लांबचा भारतात प्रवास केलेला नाही. तीच अदिती आता विमानत बसणार आहे. त्यामुळे तिच्या घरी आणि गावात तिचे खुप कौतुक होत आहे. जगातील अव्वल अंतराळ संस्थेच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी मुंबईहून रवाना होणार आहे.

आदितीचा आनंद गगनात मावेना (Aditi Parthe ZP Student)

या बातमीने अदितीला किती आनंद झाला हे सांगताना, तिने सांगितले की, ‘ नासाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये माझी निवड झाल्याचे जेव्हा मुख्यध्यापकांनी माझ्या मामीला सांगितले, तेव्हा तीला खुप आनंद झाला. सर्वात जास्त आनंद माझ्या आईला झाला. तिने मला त्यादिवशी दिवसभरात अत्यानंदाने 15 वेळा फोन केला.. माझ्या मामीला खुप आनंद झाला, तिच्या तोंडातून अत्यानंदाने शब्दच फुटत फुटत नव्हते. नासामध्ये गेल्यानंतर मोठ्या शास्रज्ञांशी मला भेटायला मिळणार आहे. तिथे काय काम चालते हे मला पहायला मिळणार आहे. याचा मला आनंद आहे.

हजारो विद्यार्थ्यांमधून अदिती पार्थेची निवड (Aditi Parthe ZP Student)

पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या 25 विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाण्याची संधी मिळाली. 6 वी आणि 7 वीत शिकणार्या तब्बल 16 हजार 671 विद्यार्थ्यांनी यासाठी परिक्षा दिली होती. त्यातून फक्त 25 विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्या 25 विद्यार्थ्यांमधील एक अदिती आहे. पहिल्या MCQ परिक्षेच्या फेरीसाठी तब्बल 13 हजार विद्यार्थ्यी बसले होते. आणि प्रत्येक ब्लॉकमधील पहिल्या 10 टक्के विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. जिथे त्यांना ऑनलाईन MCQ चाचणी द्यावी लागली. पणे शाळेत या मुलांना सरावासाठी कॉम्पुटर नसल्याने, मुख्याध्यापक अशोक बांदल यांनी दुसऱ्या फेरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना संगणक कसा चालवायचा हे शिकण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक लॅपटॉपचा वापर केला. IUCAA येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी 235 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. बरेट टप्पे पार केल्यावर या 25 मुलांची निवड करण्यात आली आहे.

अदितीची निवड झाल्याचे समजल्यानंतर तिला आता एक सायकल आणि बॅग भेट दिली आहे. आम्ही एका लॅपटॉपची विनंतीही केली आहे, अशी माहिती अदितीच्या शिक्षिका वर्षा कुथवाड यांनी दिली. अदिती ही फक्त पुस्तकी अभ्यासात हुशार आहे, असे नाही. तर की खेळ, वक्तृत्व आणि अगदी नृत्यातही चांगली आहे. तिच्यात काहीतरी वेगळे आहे, असेही तिच्या शिक्षिकेने सांगितले. अतिदुर्गम डोंगराळ भागात शिक्षण घेत असूनही, तिने सर्व टप्पे पार करत अदितीने हजारो विद्यार्थ्यांमधून बाजी मारली आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!