NCP Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद गटाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जाहीर कऱण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना पक्षाच्या वतीने तीन ओळींची व्हीप जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : 27-11-2026
केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून (NCP Sharad Pawar) आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना पक्षाच्या वतीने तीन ओळींचा व्हीप जाहीर कऱण्यात आला आहे.
30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अधिवेशनासारख्या सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच पक्ष जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला सर्व खासदारांनी पाठिंबा द्यावा, असंही म्हटलं आहे. तसेच पक्ष जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला सर्व खासदारांनी पाठिंबा द्यावा, असंही म्हटलं आहे. पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जाहीर केला आहे.
डिलिमिटेशन बिल सादर होण्याची शक्यता (NCP Sharad Pawar)
केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात हे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील एकदा भाजपकडून संसदेत डिलिमिटेशन बिल मांडण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी ते मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी हे बिल सादर कऱण्यापूर्वी भाजपने मोठी काळजी घेतली असून, मतांची आधीच जुळवाजुळव केल्याची चर्चा आहे. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय ? (NCP Sharad Pawar)
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या बिलाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. जर सर्व राज्यांना समान जागा मिळणार असतील तर पाठिंब्याचा विचार करू असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता हे बिल संसदेत सादर झाल्यास राष्ट्रवादीचे खासदार या बिलाला पाठिंबा देणार का ? हे उत्सूकतेचे ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या सर्व खासदारांना या सर्व पार्श्वभूमीवर व्हीप लागू कऱण्यात आला आहे.