Ketan Agrawal Murder Caseबेटा, तुला न्याय मिळावा ... ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधानांकडे कठोर शिक्षेची मागणी .

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केतनच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पत्र लिहून मुलाला न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि न्यायप्रक्रियेला गती मिळावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

पुणे : 14-06-2026 

महाराष्ट्रातील लोहगड किल्ल्यावर पुणेस्थित रिअल इस्टेट व्यावयासिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case)  यांच्या कथित हत्येने देशाला धक्का बसला आहे. घटनेनंतर जवळपास महिनाभराने, आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक भावनिक पत्र लिहून आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषी असलेल्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

असा आरोप आहे की, सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (22) यांनी 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याजवळ केतनला डोंगरावरून खाली ढकलेले. जाय जोडप्याचे नोव्होंबरमध्ये लग्न होणार होते. दोन्ही आरोपींना अटक कऱण्यात आली असून त्यांना 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पंतप्रधानांना पत्र (Ketan Agrawal Murder Case)

पंतप्रधानांना उद्देशून राखीने लिहिले की, तिला स्वतःच्या मुलासाठी न्याय मागावा लागेल याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. ” प्रत्येक आईप्रमाणे, मी स्वप्न पाहिले होते की केतन एक सुंदर आयुष्य घडवेल, लग्न करेल आणि त्याचे म्हातारपण आमच्यासोबत घालवेल. पण त्याऐवजी, मला माझ्या मुलावर अंत्यंसंस्कार करावे लागले, ” असे ती म्हणाली.

माझे जग उद्धस्त झाले. आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे फोटो आणि त्याच्या हास्याची जागा घेतलेली शांतता मला दररोज आठवण करून देते की तो कधीही परत येणार नाही.”

या दुखःद घटनेत कुटुंबातील आणखी एका सदस्याने आपला जीव गमावल्याचेही या शोकाकुल आईने सांगितले. तिने लिहिले, ” केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या वीस दिवसांनी माझ्या सासऱ्यांचेही निधन झाले, तेव्हा आमच्या कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला.” त्यांचे केतनवर खुप प्रेम होते आणि नातवाला गमावण्याचे दुःख त्यांना सहन झाले नाही.

काही दिवसांतच आमच्या कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्या. थेट पंतप्रधानांना आवाहन करताना राखी म्हणाली की, तिला सहानभूती नको, तर न्याय हवा आहे. ” मोदीजी, मी सहानुभूती किंवा कोणत्याही विशेष सवलती मागत नाही. मला फक्त न्याय हवा आहे. ” असे ती म्हणाली.

केतनला (Ketan Agrawal Murder Case)  परत आणता येणार नाही. परंतु त्याच्या जीवाला जबाबदार असलेल्यांना कायद्यानुसार शक्य असेलली खठोरतम शिक्षा मिळालीच पाहिजे. हात जोडून तिने पंतप्रधानांना विनंती केली की, या प्रकरणाकडे योग्य लक्ष दिले जावे आणि कोणताही विलंब न लावता न्याय मिळावा याची खात्री करावी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!