Spain Train Accident : स्पेनमध्ये एक मोठा भीषण अपघात झाला आहे. दोन हाय स्पीड-ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. या अपघाताने संपूर्ण स्पेन हादरले आहे. सोशल मीडियावर या अपघाताता व्हिडिओ समोर आला आहे.
स्पेन : 19-01-2026
स्पेनमध्ये रविवारी (18 जानेवारी) एक मोठा अपघात (Spain Train Accident )झाला आहे. दोन हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. ट्रेन एकमेकांमध्ये घुसल्या असून या धडकेत 21 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या ट्रेन अपघाताने स्पेन हादरला आहे.
अपघात कसा झाला ? (Spain Train Accident )
दक्षिण स्पेनमध्ये कोर्डोबा प्रांतात अदामुझ परिसरात हा अपघात घडला आहे. मालागाहून माद्रिदला जाणारी एक हाय-स्पीड ट्रेन रूळावरून घसरली आणि दुसऱ्या लाईनवरील ट्रेनला जाऊन धडकली. ज्यामुळे जोरदार अपघात झाला असून ट्रेन एकमेकांमध्ये घुसल्या आहेत. या अपघाताने ट्रेनचा चक्काचूर झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
कारण अजून अस्पष्ट (Spain Train Accident )
प्राथमिक माहितीनुसार, मालागाहून माद्रिद्रला जाणारी ट्रेन रूळावरून घसरून दुसऱ्या लाईनवरील ट्रेनला धडकली. परंतु ट्रेन रूळावरून नेमकी कोणत्या कारणामुळे घसरली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू कऱण्यात आला आहे. परंतु ट्रेनच्या जोरदार धडकेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सुरूवातीला पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. परंतु हा आकडा वाढला आहे. आता मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तसेच ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय 73 जण या अपघातात जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
High speed rail crash in Spain. It’s reported 5 dead so far.
Awful.
— Bernie (@Artemisfornow) January 18, 2026
प्रत्यक्षदर्शींचे अनुभव (Spain Train Accident )
प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताचे भयावह म्हणून वर्णन केले असून, ट्रेनचा एक डबा पूर्णपणे उलटला असल्याचे म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मोठ्या संख्येने रूग्णवाहिका, वैद्यकीय पथके आणि अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले होते. या अपघाताने काही क्षणांसाठी भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाल्आचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातामुळे माद्रिद आणि कॉर्डोबा, मालागा आणि हुएला या प्रमुख अँडालुसियन शहरांमध्ये हाय-स्पीड रेल्वे सेवा स्थगित कऱण्यात आली आहे. सध्या ट्रेनचा डबा, धातूचे तुकडे, खिडक्यांच्या काचा हटवण्याचे कार्य सुरू आहे. याच वेळी रेल्वे प्रशासनाने पीडीतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी विशेष केंद्रही सुरू केले आहे. रॉयल पॅलेसनेही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.