Air India Plane Crash

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट समोर येत आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या कहान्या ह्रदय पिळवटून काढत आहेत. त्यातील एक आहे लॉरेन्स. 

अहमदाबाद : 2025-06-13 

 वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तरूणाचा काल एयर इंडियाच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. एल.लॉरेन्स यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाने हंबरडा फोडला आहे. लॉरेन्स  हे 1 जून ला भारतात आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी आले होते. काल ते लंडनला परतणार होते. मात्र अहमदाबाद येथून निघालेल्या विमान मेघानी येथे कोसळलं. या भीषण अपघताता 241 प्रवाशांनी आपला जीव गमावला. यात लॉरेन्स देखील होते. लॉरेन्स यांचं कुटुंब लंडनमध्ये आहे. त्यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. अशी माहिती त्यांची आत्यांनी दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबाने आक्रोश केला. 

या अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.  सगळीकडे मृतांसाठी हळहळ व्यक्त होत आहे. 242 प्रवासी घेऊन जाणारं हे एयर इंडियाचं विमान पहिल्या दहा मिनिटात कोसळंलं आणि होत्याचं नव्हतं झालं. हा अपघात इतका भिषण होता की एक प्रवासी सोडून सगळे 241 प्रवासी जळून खाक झाले. याशिवाय हे विमान ज्या इमारतीवर कोसळले त्यातील 24 वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यात मृत्यू झाला आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!