World Environment Day : दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यवरण दिवस साजरा केला जातो. हा दिवस लोकांमध्ये पर्यवरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात वाढणारे प्रदुषण, होणारे ग्लोबल वॉर्मिंग यामुळे आता पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पृथ्वीतलावरील सर्वांची आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार आहे.
प्रासंगिक लेख : 2025-06-05
आजकाल कधीही पाऊस पडतो, वादळं येतात. वातावरणात प्रदुषण वाढत आहे. अनेक प्राणी, पक्षी आणि किटकं यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासर्वांचे मुळ एकच आहे, पर्यावरणाचा होत जाणारा ऱ्हास. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील निसर्ग, जलसंपदा यांचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज झाली आहे. जर आपण पर्यावरणाचे संतूलन साधले नाही, तर पुढील पिढ्यांचे आयुष्य कठिण असणार आहे. या सर्वाचा विचार करूनच, जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो.
हा दिवस लोकांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे ? याची जागृती करतो. त्यासाठी कोणत्या गोष्टी आपण करू शकतो याची प्रेरणा हा दिवस देतो.
Table of Contents
या दिवसाची सुरूवात कशी झाली ?
युनायटेड नेशन्सने हा दिवस साजरा करण्याची सुरूवात 1972 ला केली. तेव्हा पासून यादिवशी जगभरात हा दिवस पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रेरित करणारा दिवस म्हणून ओळखला जातो. 5 जून हा दिवस यासाठी निवडला कारण 5 जून 1972 ला युनायटेड नेशन्स जनरल असेंबली ने पर्यावरण संरक्षण या विषयावर पहिले ग्लोबल संमेलन आयोजित केले होते. यालाच स्टॉकहॉम कॉंन्फरन्स या नावानेही ओळखले जाते. या संमेलनात अनेक देशांनी सहभाग घेतला होता. या संमेलनात जगभरात येणाऱ्या पर्यावरणविषयक अडचणींवर चर्चा करण्यात आली. यानंतरच युनायटेड नेशन्स एनवायरन्मेंट प्रोगॅमची (UNEP ) ची स्थापना झाली. आणि तेव्हापासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.
या वर्षीची थिम काय ?
दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा कऱण्यासाठी, पर्यावरण विषयक एक खास थिम ठरवण्यात येते. जेणेकरून त्या दृष्टीने लोकांना पर्यावरणाविषयी एक संकल्पना घेऊन ती साकार करायला मदत मिळते. या वर्षी म्हणजे 2025 ची थीम आहे, End Plastic Pollution म्हणजेच ‘प्लॅस्टिक प्रदुषणाचा अंत’. आजच्या घडीला ही थीम फार महत्त्वाची आहे, कारण आज जगभरात प्लॅस्टिक कचऱ्याचा वाढता वापर आणि त्यापासून तयार होणारा कचरा ही फार मोठी समस्या आहे. प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडत आहे. म्हणून या वर्षीची जागतिक पर्यावरण दिवसाची थिम आहे प्लॅस्टिक प्रदुषणाचा अंत.
चला तर मग जाणून घेऊयात प्लॅस्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम –
काय आहेत प्लॅस्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम ?
प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
तो माती, पाणी आणि हवा दुषित करतो. प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण करतो. तसेच प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटनासाठी खुप जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदुषण वाढणे सगळ्यांसाठीच धोक्याचे ठरणारे आहे. शहरी भागात कचरा व्यवस्थापन दिवसेंदिवस अवघड झाले आहे. त्यामुळे एन्ड प्लॅस्टिक पोल्युशन ही थिम राबवणे आता गरजेचे झाले आहे.
पर्यावरणावरील दुष्परिणाम :
माती आणि पाणी दुषित होणे – प्लॅस्टिकचा कचरा मातीमध्ये मिसळून मातीची गुणवत्ता कमी करतो. प्लॅस्टिक पाण्यात मिसळल्या मुळे पाणी दुषित करतो, जलचर जीवांना त्यामुळे धोका निर्माण होतो. प्लॅस्टिक खाऊन किंवा त्यात अडकून अनेक सागरी जीव, पक्षी आणि प्राणी मृत्यूमुखी पडतात. प्लॅस्टिकमुळे काही प्रजाती नष्ट होतात. समुद्रातील जैवविविधता नष्ट होते. प्लॅस्टिक जाळल्याने हवा दुषित होते.
मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम :
अन्न आणि पाणी दुषित करते : प्लॅस्टिकचे कण अन्न आणि पाण्यात मिसळून ते विषारी बनतात. ज्यामुळे कर्करोगांसारख्या आजारांचा धोका वाढतो. प्रजनन समस्या वाढतात.
श्वासोच्छवास आणि फुफ्फुसांचे आरोग्य : प्लॅस्टिक तंतूंच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांना फुफ्फुसांच्या समस्या येऊ शकतात.
असे हे हानिकारक प्लॅस्टिक आपल्या रोजच्या जगण्यातून कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण पाहू.
प्लॅस्टिक आपल्या आयुष्याचा आता एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र आता त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच समजले आहेत. तेव्हा प्लॅस्टिकच्या पिशव्या कितीही आवश्यक वाटत असल्या, तरी त्यांचा वापर कमी केला पाहिजे. शक्य तेथे तुम्ही कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा.
सध्या युज ॲन्ड थ्रो चा जमाना असल्याने, अनेक गोष्टींसाठी, खाद्य पदार्थांसाठी पातळ प्लॅस्टिकचे डबे वापरले जातात. ते आपण टाळू शकतो.
आजकाल प्लॅस्टिकच्या डिश ऐवजी बाजारात केळीच्या किंवा इतर पर्यावरणपूरक झाडांच्या लगद्यांपासून बनवलेल्या डिश मिळतात, त्यांचा वापर आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाढवला पाहिजे.
दररोजचा ओला कचरा आणि प्लॅस्टिक कचरा वेगवेगळा साठवायला हवे.
जिथे शक्य आहे तिथे जुन्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरा, नविन घेण्याचे टाळूयात आणि या जागतिक पर्यावरण दिवसाच्या थिमला यशस्वी बनवूयात.
Leave a Reply