World Badminton Day 2025 : आज 5 जुलै या दिवशी संपूर्ण जगात बॅडमिंटन दिवस म्हणून साजरा केला जातो. कधी सुरू झाला जागतिक बॅडमिंटन दिवस ? काय आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व हे आपण जाणून घेऊ.
जागतिक बॅडमिंटन दिवस : 05/07/2025
Table of Contents
जागतिक बॅडमिंटन दिवस म्हणजे काय ?
जागतिक बॅडमिंटन हा 5 जुलैला साजरा करतात. या दिवशी बॅडमिंटनशी संबंधित संस्थाना एकत्रित आणून बॅडमिंटन या खेळाविषयी लोकांमध्ये जागृती केली जाते. त्यासाठी विविध संस्था बॅडमिंटन स्पर्धा भरवतात, त्यासंबंधीत कार्यक्रम आयोजित करून बॅडमिंटन खेळाच्या वाढीसाठी काम करतात. जगभरात त्यासाठी विविध प्रकारे स्पर्धा भरवल्या जातात. बॅडमिंटन या खेळाचा विकास व्हावा यासाठी हे कार्यक्रम आखले जातात. आजचा हा दिवस बॅडमिंटनसाठी समर्पित दिवस म्हणून साजरा करतात. क्रीडाविश्वात या दिवसाला महत्त्व आहे.
कधी सुरू झाला हा दिवस ?
द इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन (IBF) ज्याचे आजचे नाव बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ( BWF) आहे. ज्याची स्थापना 5 जुलै 1934 मध्ये झाली. ज्याची संस्थापक सदस्य संख्या अवघी नऊ होती. या दिवसाचे बॅडमिंटनच्या इतिहासातील महत्त्व समजावे या हेतूने ‘5 जूलै’ हा दिवस जागतिक बॅडमिंटन दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. अलिकडेच म्हणजे 2023 पासून या दिवसाची घोषणा करण्यात आली आहे.
जागतिक बॅडमिंटन दिवसाचे महत्त्व
जागतिक बॅडमिंटन दिवस आपल्याला ‘बॅडमिंटन’ या दिवसाचे महत्त्व सांगतो. हा खेळ खेळाडूच्या वैयक्तिक शारिरिक,मानसिक विकासासाठी तसेच संपूर्ण फॅमिलीच्या शारिरिक विकासासाठी कसा चांगला आहे, यासाठी या दिवसाचा उपयोग करून त्याविषयीती जागृती केली जाते. जगभरातील अनेक मुले आज हा खेळ आपले करियर म्हणून निवडतात. पण हा खेळ दैनंदिन आयुष्यात तुमच्या व्यायामाचा प्रकार म्हणूनही तुम्ही खेळू शकतात. हे सांगण्यासाठी जगभरात 5 जुलैला अनेक ठिकाणी स्पर्धा, मेळावे भरवले जातात. ज्यातून बॅडमिंटन या खेळाचे महत्त्व, त्यातील गंमत समजते. म्हणून 5 जुलै हा दिवस बॅडमिंटन खेळासाठी ओळखला जात आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू, हौशी खेळाडू आजच्या दिवशी या खेळाच्या प्रसारासाठी एखादी ॲक्टिविटी करतात.
जागतिक क्रमवारीतील खेळाडूंची नावे
जागतिक बॅडमिंटन खेळाडूंच्या यादीमध्ये पुरूष एकेरीमध्ये थायलंडच्या ‘कुनलावुत विटिडसार्न’ सध्या अव्वल क्रमांकावर आहे. महिला एकेरीमध्ये जपानची ‘अकाने यामागुची’ अव्वल स्थानवार आहे. भारताची पी.व्ही सिंधु आणि सायना नेहवाल या महिला खेळाडू जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर आहेत. याशिवाय जागतिक स्तरावर इतरही अनेक खेळाडू आहेत. ही यादी सतत बदलत असते.
बॅडमिंटन खेळाचा इतिहास
बॅडमिंटन खेळाचा इतिहास खुप जुना आहे. त्याची मुळे प्राचीन एशियन आणि युरोपियन खेळांमध्ये आहे. पूर्वी जसे की, बॅडलडोर आणि शटलकॉक वापरून काही खेळ खेळले जात असत. हे खेळ प्राचीन चीन, जपान, ग्रीस आणि इजिप्त मध्ये खेळले जात असत. बॅडमिंटनचा विकास 19 व्या शतकातील ब्रिटिश सैनिकांनी भारतात असताना केला. त्यांनी या खेळाला ‘बॅटलडोर’ म्हटले आणि त्याचे नियम तयार केले. त्यांनी हा खेळ ‘शटलकॉक’ आणि ‘रॅकेटचा’ वापर करून खेळण्यास सुरूवात केली. भारतातील ब्रिटीशसत्ता संपल्यानंतर हा खेळ ब्रिटन मध्ये गेला आणि तेथे तो खेळला जाऊ लागला. तेथे अधिक लोकप्रिय झाला. 1870 च्या दशकात ड्यूक ऑफ ब्युफोर्टच्या ‘बॅडमिंटन हाऊस’ नावाच्या घरी या खेळाचे प्रदर्शन झाले आणि त्यामुळे ‘बॅडमिंटन’ हे नाव रूढ झाले असे मानतात. 1893 मध्ये इंग्लंडमधील ‘बॅडमिंटन असोसिएशनची’ स्थापना झाली आणि या खेळाचे नियम तयार कऱण्यात आले. त्यानंतर 1992 मध्ये बॅडमिंटन या खेळाचा अधिकृतपणे ऑलम्पिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला. 1899 मध्ये पहिली ‘ऑल इंग्लड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जी जगातील पहिली बॅडमिंटन स्पर्धा मानली जाते. 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रात्यक्षिक खेळ म्हणून सादर कऱण्यात आला होता. आणि 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिक मध्ये अधिकृतपणे ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा समावेश करण्यात आला. 1934 मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघ (आता त्याला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ) ची स्थापना झाली, ज्यामुळे या खेळाचा जागतिक स्तरावर विस्तार होण्यास सहाय्य झाले. तो दिवस होता 5 जुलै म्हणूनच हा दिवस जागतिक बॅडमिंटन दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.
भारतीय खेळाडूंचे यश
भारताती अनेक खेळाडूंनी या खेळात जागतिक स्तरावर नाव कमावलेले आहे. त्यातील महत्त्वाची नावे म्हणजे प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल, पुलेला गोपीचंद, पी.व्ही सिंधू यांची नावे घेता येतील. क्रिकेटवेड्या भारतात सध्या या खेळालाही चांगले दिवस आले आहे. जागतिक बॅडमिंटन दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने या खेळाची माहिती करून घेतली पाहिजे. शक्य असेल तर, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा समावेश करून, निरोगी जीवनशैलीचा अंगिकार करता येऊ शकतो.
Leave a Reply