West Asia War Update: युद्धाच्या परिस्थितीमुळे व्यापाराचे भारत गरजेच्या 85 टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यातील 65 टक्के पश्चिम आशियातून येते. युद्धस्थिती वाढल्यास भारतीयांच्या नोकऱ्या व उत्पन्नावर परिणाम होईल.
नवी दिल्ली : 25-03-2026
पश्चिम आशियातील युद्ध (West Asia War Update) आणि इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरातील पेट्रोलियम पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम भारतावर होत असून, आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणमि गॅसच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत या परिस्थितीवर भाष्य करताना इंधन दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, युद्धाच्या परिस्थितीमुळे व्यापाराचे भारत गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो, त्यातील 65 टक्के पश्चिम आशियातून येते. युद्धस्थिती वाढल्यास भारतीयांच्या नोकऱ्या व उत्पन्नावर परिणाम होईल मार्ग प्रभावित झाले असून, भारतासाठी ही स्थिती चिंताजनक आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, देशाला आगामी, ‘अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल. तेल कंपन्यांननी गॅस पुरवठ्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. ज्यांच्याकडे दोन सिलेंडर आहेत. त्यांना आता 35 दिवसांनंतर एक सिलेंडर आहे. त्यांना तो 25 दिवसांनंतप मिळेल. देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. सीएनजीचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने मोठ्या वाहनांना तासनतास ताटकळावे लागत आहे.
या गंभीर संकटावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने आज, बुधवारी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. यामध्ये सरकार कॉंग्रेसह सर्व विरोधी पक्षांना सध्याची स्थिती आणि सरकारच्या तयारीबाबत माहिती देणार आहे.
भारताच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष (West Asia War Update)
दुसरीकडे, पश्चिम आशियातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे इस्रायल-अमेरिका-इराण युद्ध हळूहळू अणूयुद्धाच्या उंभरठ्यावर आले आहे. इराणने दिमोना आणि अरादसारख्या इस्रायलच्या अत्यंत संवेदनशील अणुसंशोधन केंद्रांना लक्ष्य करून अनेक शहरांवर क्लस्टर बॉम्बचा मारा केला. इस्रायलला धक्का बसला.