Vishwas Nangare Patilवाहतूक पोलिसांना आता 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा मोठा निर्णय

Vishwas Nangare Patil : नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता नागपुरात नाकाबंदी व ड्युटीवर असताना वाहतूक पोलिसांना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य कऱण्यात आले आहे.

नागपूर : 22-07-2026 

वाढता गुन्हेगारीचा दर आणि कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचारऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil ) यांनी वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी, विशेष तपास आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक आहे. पोलीस आयुक्तांनी गुरूवारी यासंबंधी आदेश जाहीर केले.

‘सर्व्हिस गन’ बाबतचा निर्णय का घेण्यात आला ? (Vishwas Nangare Patil)

शहरातील नाकाबंदी आणि वाहन तपासणीदरम्यान गुन्हेगार, संशयित व्यक्ती आणि वाहतुकीचे नियम मोडणारे अनेकदा पोलिसांच्या कारवाईला विरोध करतात. अनेक घटनांमध्ये वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण आणि अगदी जीवघेण्या हल्ल्यांचाही सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ संरक्षण आणि आत्मसंरक्षण देता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वास आहे की, वाहतूक पोलीसदेखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आघाडीवर काम करतात आणि अनेकदा त्यांना तात्काळ कारवाईची आवश्यकता असलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना आवश्यक सुरक्षा साधनांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे.

स्वच्छ आणि निटनिटके राहण्याचा सूचना  (Vishwas Nangare Patil)

दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त (सीपी) विश्वास नांगरे पाटील यांनी वाहतूक शाखेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना स्वच्छ आणि नीटनेटके राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी स्वच्च गणवेश, शिस्तबद्ध वर्तन आणि नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध यावर विशेष भर दिला होता. आता, सुरक्षेच्या कारणास्तव ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य करणारा आदेश जाहीर करून, त्यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यशैलीत शिस्त आणि तत्परता या दोन्हींना प्राधान्य दिले आहे. या सूचनांनुसार, नागपूर शहरातील प्रमुख चौक, विशेष तपासणी नाके आणि संवेदनशील भागांमध्ये या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, यामुळे केवळ वाहतूक पोलिसांचे मनोधैर्यच वाढणार नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्तींनाही प्रभावीपणे आळा बसेल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ‘सर्व्हिस गन’ आवश्यक  (Vishwas Nangare Patil)

शहरातील सर्व डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ बाळगण्याचे निर्देश दिले होते. गेल्या काही महिन्यांत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस दलातील सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेरागीचे बदलते स्वरूर आणि वाढच्या आव्हांनाच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दलाला पूर्णपणे सज्ज ठेवण आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!