Vishanavi Hagwane case Update : वैष्णवी हगवणे प्रकरणात दिवसेंदिवस मोठे टर्न ॲन्ड ट्विस्ट येत आहेत. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात आरोपी हगवणे कुटुंबाला वाचविण्यासाठी वैष्णवीवर विविध आरोप लावले जात आहेत. त्यांच्या वकिलामार्फत वैष्णवीच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे. यावर आता महिला आयोगानेही दखल घेतली आहे.
पुणे : 2025-05-30
पुण्यामधील मुळशी तालुक्यातील तरूणी वैष्णवी हगवणे (Vishanavi Hagwane ) हिने 16 मे ला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनंतर संपूर्ण हगवणे कुटुंबाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कोठडी संपवून त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले. यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी विपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल असा युक्तिवाद केला आहे. वैष्णवी ही चुकिच्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करत असल्याने काही वाद निर्माण झाले, आणि त्यातून नवऱ्याने एखाद्यावेळी हात उचलला असेल तर तो घरगुती हिंसाचार ठरत नाही, अशा आशयाची अनेक संतापजनक विधाने हगवणेच्या वकिलांनी केले आहेत.
दुशिंग यांच्या अशा अनेक दाव्यांमुळे जनमानसाच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीच्या वडिलांनीही यावर दुःख व्यक्त करत, माझी मुलगी तर आता या जगात नाही, परंतु तिच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवू नका म्हणून त्यांनी विनंतीही केली आहे.
हगवणे कुटुंबाच्या वकिलांचा युक्तिवाद
हगवणे कुटुंबाला जामिन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दुशिंग यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. जर वैष्णवीला (Vishanavi Hagwane ) मृत्यू आधी पाच दिवस मारहाण होत होती ? तरी ती घरात कशी बसेल ? या काळात तिचा तिच्या आई वडिलांशी कोणताच संपर्क नव्हता का ? ती घर सोडून का गेली नाही ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माझ्या युक्तीवादाला माध्यमांनी “मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवले आहे” अशी भूमिका मांडली. हे पाहून मला दुःख वाटत आहे. वैष्णवी आणि तिच्या नवऱ्याच्या भांडणाचे कारण मोबाईल हे होते. तसे तिच्या आई-वडिलांनाही सांगण्यात आले होते, असा दावाही दुशिंग यांनी केला आहे.
न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी हगवणे कुटुंबाच्या जामीनासाठी प्रयत्न करणार आहोत. लोकांच्या या प्रयत्नासाठी वाईट प्रतिक्रीया येत आहेत, याचं मला वाईट वाटत आहे. लोकं ट्रोल करणार हे मला माहित होते. हगवणे कुटुंबाची बाजू मांडून मी धोका पत्करला आहे. मी माझं काम योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे, असे दुशिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हगवणे कुटंबाला 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी
दरम्यान वैष्णवीचा (Vishanavi Hagwane ) पती शशांक हगवणे, तिची सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावली आहे. त्यांची सध्या येरवडा कारागृहात रवनागी केली आहे.
महिला आयोगाकडून दखल
वैष्णवी हगवणे (Vishanavi Hagwane ) आत्महत्या प्रकरणात आरोपीचे वकिल ज्या पद्धतीने बाजू मांडत आहेत, त्यावर महिला आयोगाने आक्षेप घेत त्याची दखल घेतली आहे. वैष्णवी हगवणे केस मधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन हे ॲडव्होकेटस् कायदा, 1961 मधील तरतूदींचे उल्लंघन करणारे आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये वकिलांनी माध्यमात बोलताना भान बाळगणे गरजचे आहे. राज्य महिला आयोगाने सचिव, बार कौन्सिल यांना पत्र लिहून याबाबत गांभिर्याने विचार व्हावा आणि अधिवक्तांसाठी सुस्पष्ट नियमावली ठरवावी अशा सूचना केल्या आहेत. असे आयोगाने एका पत्राद्वारे कळवले आहे.
Leave a Reply