Varandha Ghat Closed : सध्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरलेला आहे. त्यामुळे सर्वत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगड जिल्ह्यातील महाडला येणारा वरंध घाट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : 2025-06-20
अलिबाग-पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वरंध घाट (Varandha Ghat ) वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्याधिकारी यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंदी असणार आहे. प्रवाश्यांनी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुरक्षिततेच्या कारणासाठी पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगड जिल्ह्यातील महाडला येणारा वरंध घाट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका राज्य परिवहनमहामंडळाच्या बसेस, मालवाहतूक करणारे ट्रक, हलकी वाहने यांना बसणार आहे. त्यामुळे कोट्यावधी रूपये खर्चून दुरूस्त करण्यात आला होता. पावसाळ्यात वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे धोका?
गेल्या काही वर्षांमध्ये या घाटामध्ये दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले आहेत.त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागातर्फे या मार्गाची कोट्यावधी रूपये खर्चून दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात प्रवासासाठी हा मार्ग धोकादायक असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या कारणांसाठी वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Leave a Reply