Vande Bharat Train : पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.
पुणे : 16/07/2025
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पिड कनेक्टिव्हीटी मजबूत होण्यास मदत होणार आहे. या 4 वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिंकदराबाद आणि बेळगाव जाणार्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या 4 वंदे भारत ट्रेनचे थांबे कोणत्या स्टेशनवर असतील हे जाणून घेऊ.
Table of Contents
पुणे -शेगाव वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)
पुणे-शेगाव वंदे भारत या ट्रेनचे थांबे दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे असण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रेकरूंना या ट्रेनचा लाभ घेता येणार आहे. भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. पुण्यातून अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात असतात, अशा भाविकांसाठीच ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train)
पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. सध्याचा पुण्यावरून वडोदऱ्याला जाण्यासाठी 9 तासांचा वेळ लागतो. वंदे भारत ट्रेन मुळे हा प्रवास 6 ls 7 तासांत होणार आहे. या ट्रेनमुळे व्यावसायिकांना खास फायदा होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.
पुणे-सिकंदराबाद वंदे भारत (Vande Bharat Train)
पुणे-सिकंदराबाद ही वंदे भारत ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा येथे थांबवण्याची शक्यता आहे. या वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ 2-3 तास कमी होणार आहे. ही नविन ट्रेन व्यावसायिक, तांत्रिक आणि आयटी व्यावसायिकासांठी फायदेशिर ठरणारी आहे.
पुणे-बेळगाव वंदे भारत (Vande Bharat Train)
पुणे-बेळगाव वंदे भारत ट्रेनचे सातारा, सांगली, मिरज येथे थांबवण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागाचा पुण्याशी संपर्क वाढणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचे 2-3 तास वाचणार आहे.
पुणे-नागपूर स्लिपर वंदे भारत सुरू होणार (Vande Bharat Train)
रेल्वे मंत्रालय सध्या स्लिपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत स्लिपर ट्रेन सुरू केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राची उपराजधानी आणि सास्कृतिक राजधानी जोडली जाणार आहे. याचा सर्व स्तरातील लोकांना फायदा होणार आहे.
Leave a Reply