Vaishanavi Hagwane Case Update : वैष्णवी हगवणे प्रकरणातील मोठी घडामोड. अखेर फरारी निलेश चव्हाणला अटक झाली आहे. या प्रकणातील ही मोठी घडामोड म्हणता येईल. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.
पुणे : 2025-05-30
वैष्णवी हगवणे (vaishanavi Hagwane) आत्महत्या प्रकरणातील आणखी एक आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणेचा मित्र, निलेश चव्हाण याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याला नेपाळ येथून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे या तरूणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर वैष्णवीचे नऊ महिन्याचे बाळ, या निलेश चव्हाणच्या ताब्यात होते. वैष्णवीच्या माहेरचे जेव्हा बाळाला घ्यायला गेले, तेव्हा चव्हाण याने बंदूकीचा धाक दाखवत त्यांना धमकावले होते. असे अनेक आरोप असणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर नेपाळ येथून अटक करण्यात आली आहे.
निलेश चव्हाण कोण ? त्याच्यावरील आरोप कोणते ?
आरोपी हगवणे कुटुंबाच्या अत्यंत जवळचा माणुस अशी या निलेश चव्हाणची ओळख आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना अटक झाली, तर सासरा राजेंद्र आणि दिर हे फरार होते. अशा परिस्थीतीत वैष्णवीचे 9 महिन्याचे बाळ हे हगवणे कुटुंबियांनी निलेश चव्हाण कडे सोपवले होते. मात्र त्याने कस्पटे कुटुंबाला ते देण्यास नकार देत, बंदुकीचा धाक दाखवत, धमकावले होते. याशिवाय त्याच्यावर असणाऱ्या इतर पोलीस प्रकरणांचाही सुगावा लागला. तो फरार असल्याने त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंंट काढले होते. त्याच्या संपत्तीवर जप्ती आणली जाणार होती. न्यायालयाच्या या आदेशामुळेच निलेश चव्हाण पोलीसांच्या ताब्यात आला आहे.
पोलीसांकडून निलेश चव्हाणला शोधण्यासाठी तीन पथक पाठवण्यात आली होती. शेवटी नेपाळ मधून त्याला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी त्याला नेपाळ मध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्या प्रकरणी त्याला सध्या अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यादिवसापासून तो फरार होता. निलेश चव्हाण हा करिष्मा हगवणे हिता मित्र आहे. तो घरातील भांडणांमध्ये बऱ्याचदा मध्यस्ती असे अशी माहीती वैष्णवीची जाऊ मयुरी जगताप हिन दिली होती. त्यामुळे निलेश चव्हाण याच्या अटकेला महत्त्व आहे.
Leave a Reply