Vaishanavi Hagwane

राज्यात वैष्णवी  (Vaishanavi Hagwane ) हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यातच एक नाव म्हणजे आयपीएस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर ( Ips Jalinder Supekar ) . त्यांची बदली केली गेली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपामुळेच त्यांच्याविषयी ही कारवाई केली गेल्याचे म्हटले जात आहे. 

पुणे : 2025-05-29

वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane ) प्रकरणात पहिल्या दिवसापासून चर्चा आहे, ती हगवणे कुटुंबियांना असणाऱ्या राजकिय वरदहस्ताची. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या हगवणे कुटुंबीयांना, शशांक हगवणेच्या  आयपीएस मामांचाही  पाठिंबा असल्याचे आरोप केले जात होते. या आरोपांमुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. यासर्वांचा परिणाम म्हणूनच जालिंदर सुपेकर यांना मोठा दणका बसला आहे. त्यांच्याकडून कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. 

 डॉ.जालिंदर सुपेकर ( Ips Jalinder Supekar ) यांचे नाव वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सातत्याने घेतले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील जालिंदर सुपेकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांची पुणे विभागात बदली करण्यात आली आहे. 

हगवणे कुटुंब जेव्हा वैष्णवी आणि तिची जाऊ मयुरी हिचा छळ करत होते, तेव्हा सुपेकरांची त्यांना साथ होती असे आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर होत आहेत. यासर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुपेकरांच्या बदलीची कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. 

हगवणे कुटुंबियांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने वैष्णवीची सासू, पती, नणंद यांच्या पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवली होती, तर सासरा आणि दिर यांची पोलीस कोठडी  कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली  आहे. शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यांना आता न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!