US-Iran Peace Signed : अमेरिका-इराणमधील संघर्ष अखेर थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून 60 दिवसांची शस्रसंधी लागू होईल. या काळात दोन्ही देशांमध्ये अंतिम करारावर चर्चा होईल.
वॉशिंग्टन : 18-06-2026
मध्यपूर्वेतील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे सध्या अवघे जग चिंतेत आहे. चार महिन्यांपासून सुरू असलेला मध्यपूर्वेतील अमेरिका इराण संघर्ष संपण्याची (US-Iran Peace Signed) अधिकृत घोषणा कऱण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराच्या MOU वर स्वाक्षरी केली आहे. तसेच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेक्शियान यांनी देखील डिजिटल स्वाक्षरी केली असल्याची माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (17 जून) डोनाल्ड ट्रम्प आणि मसूद पेझेक्शियान यांनी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला धोकादायक संघर्ष आता थांबणार आहे. अमेरिकेच्आ व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांच्या उपस्थित करारावर स्वाक्षरी केली. या करारावर जगाला दिलासा मिळाला असून दोन्ही देशांतील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणच्या प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार प्रत्यक्षात लागू कऱण्यात आला असून याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. येत्या शुक्रवारी जिनिव्हा येथे दोन्ही देशांचे वाटाघाटी पथक उपस्थित राहिलेय परंतु स्वतंत्र स्वाक्षरी सोहळा
होणार नाहीय.
🚨 President Donald J. Trump has SIGNED the Iran Memorandum of Understanding at Versailles in France. 🇺🇸 pic.twitter.com/JQ6qlbvFAF
— The White House (@WhiteHouse) June 17, 2026
अमेरिका-इराण युद्ध (US-Iran Peace Signed)
फेब्रुवारी 28 रोजी दोन्ही देशांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. अमेरिका-इस्रायल इराणविरोधात युद्ध छेडले होते. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याने हे युद्ध अधिकच पेटले होते. एप्रिल मध्ये दोन्ही देशांमध्ये काही काळासाठी शस्रसंधी लागू कऱण्यात आली होती. यामुळे होमुर्झ मार्ग बंद होऊन जागतिक स्तरावर कच्चा तेल आणि वायुचा पुरवठा खोळंबून इंधन-उर्जा संकट निर्माण झाले होते.
हा संघर्ष संपुष्टात आला असून, दोन्ही देशांमध्ये 60 दिवसांची युद्धबंदी जाहीर करण्यात येणार आहेय या काळात अंतिम करारावर चर्चा होईल. तसेच इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिकेकडून निधी देण्याचे आणि निर्बंध हटवण्याचे मान्य करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणही आण्वस्रे न बाळगण्याच्या मुद्द्यावर समहत आहे.
President Pezeshkian and his US counterpart Trump signed the MoU between Tehran and Washington digitally and remotely. pic.twitter.com/ratIJxoeLG
— Iran in India (@Iran_in_India) June 18, 2026