Gold,silver rate

Todays Gold,silver Rate : गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढच होताना दिसत आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. सोनं-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पाहूयात सध्याते दर.

मुंबई : 19/09/2025 

सोन्या-चांदीच्या दरामध्ये  (Gold,silver Rate ) वाढ सुरूच आहे. आज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. गेल्या नऊ महिन्यांमधील सोन्या-चांदीच्या दरात तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा मोठा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना होताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्यांचे सण-उत्सव आणि लग्न यांत सोने खरेदीसाठी अवघड झाले आहे.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 31 हजार 800 रूपये तर चांदीच्या दरात 40 हजार 300 रूपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 78 हजार 500 रुपये प्रति तोळा आणि चांदीचा दर 89 हजार 500 रूपये प्रति किलो एवढे होते. नऊ महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज सोन्याचे दर विना जीएसटी प्रति तोळा 1 लाख 10 हजार 300 रूपयांत पोहोचले आहेत. तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 29 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तब्बल 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे सराफांकडून सांगण्यात येत आहे. केवळ नऊ महिन्यात सोन्याचे दर तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्यामुळे सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा चांगला परतावा देखील मिळत असल्यांच व्यावसायिकांनी सांगितले आहे.

काय आहेत सोने-चांदी दरवाढीची कारणं ? (Gold,silver Rate ) 

रशिया-युक्रेन युद्ध, डॉलरच्या दरात झालेली वाढ तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट संदर्भातील धोरणं या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्या चांदीत्या दरावर परिणान झाला आहे. जागतिक परिस्थिती साततत्यांने बदलत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात देखील सतत चढउतार होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर सव्वा लाख तर चांदीचे दर दीड लाखांपर्यंत पोहोचतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!