School Holidays 2025

School Holidays 2025 : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी 2025-2026 साठीचे सुटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षभरात विद्यार्थ्यांना रविवार धरून एकुण किती सुटी मिळणार आहे हे जाणून घेऊ. 

पुणे : 28/06/2025

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी 2025-26 साठीचे सुटीचे (School Holidays 2025)  वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना वर्षभरात एकुण 128 सुटी मिळणार आहे. यामध्ये 52 रविवार आहेत. रविवार शिवाय 76 अधिकृत सुट्यांचा समावेश आहे. यामध्ये दिवाळीची 10 दिवसांची (16 ते 27 ऑक्टोबर ) आणि उन्हाळ्याची 38 दिवसांची (2 मे ते 13 जून) सुटी ही मोठी सुटी असणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाने सुट्यांटी रचना आणि सणवार यांची माहिती सविस्तर दिली आहे. जिल्हा परिषद शाळा सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 या वेळेत भरतील. अर्धवेळ शाळांसाठी सकाळी 9 ते दुपारी 1:30 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात घेतलेल्या सुट्यांची पूर्वसूचना किमान तीन दिवस आधी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात द्यावी. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

मार्च महिन्यात सर्वाधिक 6 सुट्या 

सार्वजनिक सणांमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक 6 सुटी मिळणार आहे. शाळांच्या कामकाजाच्या दिवशी 60 मिनिटांची मोठी आणि दोन 10 मिनिटांच्या छोट्या सुट्या ठेवण्यात येणार आहेत. दुबार सत्रासाठी 35 मिनिटांची मोठी आणि 10 मिनीटांची लहान सुटी असेल. 

तीन दिवस सुटीसाठी मंजूरी आवश्यक 

गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आहेत. स्थानिक सण जर यादीत दिलेल्या तारखेला नसल्यास, सुटी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व गटशिक्षणाधिकारी यांची मंजूरी आवश्यक आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!