Thackeray Brothers

Uddhav And Raj Thackeray : विजयी मेळाव्यानंतर लगेचच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा करिष्मा दिसायला लागला आहे. मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ज्या सुशील कोडीयाने राज ठाकरे यांना डिवचले होते. त्यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. हा व्हिडीयो सध्या व्हायरल होत आहे. 

मुंबई : 05/07/2025

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या हिंदी सक्तीच्या मुद्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलेले आहे. अशात शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवूकदार आणि केडियोनॉमिक्स (Kedianomics) या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्यावरून चॅलेंज केले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीच्या विजयी मेळाव्याच्याआधीच केडियाचे ऑफिस फोडले होते. त्यांच्या ऑफिसवर नारळ फेकले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केडिया यांनी सपशेल माघार घेत माफीनामा सादर केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. 

आज 5 जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाते उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. जवळपास मराठी माणसाने यासाठी 18 वर्षे वाट पाहिली आहे. या मेळाव्यातील भाषण संपत नाहीत तोपर्यंतच सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. 

सुशील केेडियांची माफी 

सुशील केडिया यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंट वरून एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोच्या सुरुवातीला ते, नमस्कार, माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे, असे म्हणताना दिसतात. पुढे राज ठाकरे यांची ते माफी मागताना दिसतात. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाले आहेत. 

सुशील केेडिया काय म्हणाले होते ? 

“नोंद घ्या राज ठाकरे, मी तीस वर्षांपासून मुंबईत रहातो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पहाता मी पण प्रतिज्ञा करतो, जोपर्यंत तुमच्यासारखे लोकं मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आङेत. तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…” असे सुशील केडीया म्हणाले होते. सुशील केडिया हे केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात. शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशीही त्यांची ओळख आहे. 

Leave a Reply

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!